गोंदिया: धान व भरडधान्याच्या किमान आधारभुत किमती जाहीर

709 Views
प्रतिनिधि।
गोंदिया,दि.27 : पणन हंगाम 2020-21 मधील किमान आधारभुत किंमत खरेदी योजनेअंतर्गत धान व भरडधान्याच्या किमान आधारभुत किमती केंद्र शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या आहेत.जाहीर केलेल्या किमतीनुसार पणन हंगाम 2020-21 अंतर्गत आधारभुत धान खरेदी योजनेअंतर्गत हमी भावाने धान खरेदी करण्यात येईल. धान/भात (साधारण) किमान आधारभुत किंमत रु.1868 प्रती क्विंटल, शेतकऱ्यांना द्यावयाचा प्रत्यक्षात दर रु.1868 आहे. धान/भात (अ दर्जा) किमान आधारभुत किंमत रु.1888 प्रती क्विंटल, शेतकऱ्यांना द्यावयाचा प्रत्यक्षात दर रु.1888 आहे. धान खरेदी केंद्रावर कोणत्याही परिस्थितीत नॉन एफ.ए.क्यू. दर्जाचे धान खरेदी केले जाणार नाही. तसेच दररोज सायंकाळी खरेदी केंद्रे बंद झाल्यानंतर खरेदी केंद्रावर आणलेले परंतू खरेदी न झालेले धान/भरडधान्य सांभाळण्याची जबाबदारी संबंधित शेतकऱ्यांचीच राहील याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी. असे जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांनी कळविले आहे

Related posts