गोंदिया जिल्ह्यात कलम 37 (1) (3) लागू

829 Views

 

हकीक़त न्यूज।
गोंदिया,दि.27 : 28 ऑक्टोबर ते 11 नोव्हेंबर 2020 या कालावधीत जिल्ह्यात विविध पक्ष व संघटनांकडून त्यांच्या प्रलंबीत मागण्यासंदर्भाने उपोषणे, धरणे, मोर्चे, रास्तो रोको, जेल भरो व संप इत्यादी आंदोलने आयोजित केली जात आहे. तसेच 30 ऑक्टोबर रोजी ईद-ए-मिलाद तसेच कोजागिरी पौर्णिमा हा सण/उत्सव साजरा होणार आहे. त्याचप्रमाणे कोरोना विषाणूमुळे उदभवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव लक्षात घेता, जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालये कोविड केअर सेंटर, DCHC, DCH आणि खाजगी कोविड हॉस्पीटलच्या ठिकाणी येणाऱ्या रुग्णांची संख्या निरंतर वाढत चालली आहे. अशा परिस्थितीत वरील ठिकाणी लोकांची गर्दी वाढत असल्याने कोणतीही अनुचित घटना घडू नये, तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने 28 ऑक्टोबर ते 11 नोव्हेंबर 2020 पर्यंत सन 1951 च्या मुंबई पोलीस अधिनियमाची कलम 37 (1) (3) चे मनाई आदेश अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी सुभाष चौधरी यांनी लागू केले आहे. अधिसूचनेतील कोणत्याही शर्तीचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर फौजदारी नियमाअंतर्गत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.

Related posts