गोंदिया: हाजराफॉल होणार 1 नोव्हेंबरपासून सुरु… 65 वर्षावरील पर्यटकास प्रवेश बंदी

430 Views

 

हक़ीकत न्यूज।
गोंदिया,दि.27 : जिल्ह्यातील पर्यटकांचे आकर्षण केंद्र असलेले वनाच्या कुशितील सालेकसा तालुक्यातील वन पर्यटनस्थळ हाजराफॉल 1 नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. त्यामुळे आता पर्यटकांना या पर्यटनाचा आनंद घेता येणार आहे. शासनाने कोविड-19 संदर्भात वेळोवेळी दिलेल्या सूचना व आदर्श कार्यपध्दतीचे हाजराफॉल पर्यटनस्थळी काटेकोरपणे पालन करण्यात येईल. पर्यटकांना सुध्दा कोविड-19 करीता दिलेल्या अटी व शर्तीच्या अधिन राहूनच पर्यटनस्थळी प्रवेश दिला जाईल. 65 वर्षावरील व्यक्तींना प्रवेश दिला जाणार नाही. हाजराफॉल येथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तिंना मास्क व सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक असेल, असे न करणाऱ्या पर्यटकांना पर्यटन क्षेत्रात प्रवेश दिला जाणार नाही.
पर्यटन क्षेत्रात एकावेळी जास्तीत जास्त 200 पर्यटकांना प्रवेश दिला जाईल. पर्यटन क्षेत्रात येणाऱ्या प्रत्येक वाहनांमध्ये सॅनिटायझर असणे बंधनकारक असणार आहे. पर्यटकांना शासनाने कोविड-19 बाबत दिलेल्या सूचना व आदर्श कार्यपध्दतीबाबत माहिती मिळणेकरीता प्रवेशद्वारावर व इतर महत्वाच्या ठिकाणी फलक लावण्यात येतील. पर्यटनस्थळी येणाऱ्या पर्यटकांकडून सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे बंधनकारक राहील. प्रवेशद्वारावर येणाऱ्या पर्यटकांचे थर्मल सेंसरद्वारे तापमान मोजण्यात येईल. कोविड-19 ची लक्षणे असणाऱ्या व्यक्तींना पर्यटनस्थळी प्रवेश दिला जाणार नाही. पर्यटकांसाठी प्रवेशद्वारावर सॅनिटायझर व मास्क उपलब्ध असेल. तसेच उपहारगृहाकरीता शासनाने दिलेल्या निर्देशांचे हाजराफॉल कॅफे आणि खाजगी कॅन्टीन येथे पालन करण्यात येईल.

Related posts