गोंदिया: रेती चोरी प्रकरणी 3 इसमां विरुद्ध आमगांव पोलिसांची कारवाई, 13 लाख 9 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त..

466 Views

 

गोंदिया(30 मार्च)। जिल्हयातील वाढते चोरी व गुन्हेगारीचे प्रमाण लक्षात घेवून गोंदिया जिल्हयातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी यांना त्यांचे पोलीस ठाणे हद्दीत चालणारे सर्व प्रकारचे अवैध धंदे दारू, मटका, जुगार, अवैध गौण खनिज रेती चोरी,यासारखे व ईतर अवैध धंदे, यांचेवर धाडी घालून प्रभावी कारवाई करण्याबाबत तसेच जिल्ह्यातील सर्व अवैध धंदे समुळ नष्ट करून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इसमांवर कायदेशीर कारवाई करण्याबाबत एसपी गोंदिया यांनी निर्देश दिले होते.

या अनुषंगाने जिल्ह्यात अवैध धंद्याविरुद्ध तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इसमा विरूद्ध सर्व पोलीस ठाणे हद्दीतील अवैध धंदयावर, छापे टाकून धडक कारवाई करण्यात येत आहे.

या अनुषंगाने पोलीस अधीक्षक, गोंदिया निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक, गोंदिया, कॅम्प देवरी, अशोक बनकर, यांचे आदेश व निर्देशाप्रमाणे, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग आमगाव, विजय भिसे , पो. ठाणे आमगाव चे पो. नि. युवराज हांडे यांचे मार्गदर्शनाखाली आमगाव परीसरातील अवैध धंद्याविरुद्ध, व गुन्हेगारी प्रवूत्तीच्या ईसंमा विरूद्ध कारवाई ची मोहीम राबविण्यात येत आहे .

पो. ठाणे आमगाव येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी गुप्त बातमीदार मार्फत प्राप्त माहिती वरून दिनांक – 29/03/2023 रोजी सायंकाळ दरम्यान मौजा -पोकरीटोला येथील नदीघाट परीसरात अवैध रीत्या गौण खनिज रेतीची चोरी करून वाहतूक करणाऱ्या तिघांना ट्रॅक्टर सह पकडण्यात आले.

*सदर प्रकरणी पो. ठाणे आमगाव येथे ट्रॅक्टर चालक – मालक नामे 1) सचिन थानेश्वर सोनवाने वय 32 वर्षे, 2) गोविंदा मन्साराम चक्रवर्ती वय 32 वर्ष, 3) ऋषी गणेश उईके वय 24 वर्ष तिन्ही रा. टाकरी ता. आमगांव जि. गोंदिया यांचेविरुद्ध पो.ठाणे आमगाव येथे अपराध. क्र. 93/2023 कलम 379, 34 भारतीय दंड संहिता अन्वये गुन्हा नोंदविण्यात आले.

वरील नमूद आरोपी क्र. 1 ते 3 यांचे ताब्यातून 1)एक हिरव्या रंगाचा जान डियर कंपनीचा ट्रॅक्टर व लाल रंगाची ट्राली एम. एच. 35 एफ. किंमती 4 लाख रु. त्यामध्ये रेती 1 ब्रास किमती 3,000/-रु.

2) एक ट्रॅक्टर क्र.एम.एच. 35 जी. 8621 जुना वापरता व बिना नंबरची ट्राली किंमती 4 लाख 50 हजार /- रु. त्यामध्ये रेती 1 ब्रास कि. 3,000/-रु.

3) एक टॅक्टर क्र.एम.एच. 35 जी. 5719 जुना वापरता लाल रंगाचा व जुनी वापती ट्राली किंमती 4 लाख 50 हजार/- रु. व त्यामध्ये रेती 1 ब्रास किमती-3,000/- रु. असे एकूण 3 ट्रॅक्टर व 3 ब्रास वाळू (रेती)एकूण किंमती – 13 लाख, 9 हजार /- रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

सदरची कारवाई वरिष्ठाचे मार्गदर्शनाखाली पो. ठाणे आमगाव चे पो. नि. युवराज हांडे, यांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे आमगाव येथील पो.उप.नि खेडकर ,पोलीस अंमलदार पो. हवा. कोसमे, चौधरी, पोशि. मेंगरे, आडे, मुनेश्वर यांनी केलेली आहे.

Related posts