गोंदिया: लांडग्यांच्या हल्ल्यात सात शेळ्या ठार मुंडीपार ( खुर्द) येथील घटना

571 Views

 

गोंदिया-(ता.30) शेतशिवारात चराईसाठी गेलेल्या शेळ्यांचा कळपावर जंगलातील लांडग्यांनी केलेल्या हल्ल्यात सात शेळ्या मृत्यू तर तीन जखमी झाल्याची घटना गोंदिया तालुक्यातील मुंडीपार (खुर्द) येथे गुरुवारी( ता. 30) दुपारच्या सुमारास घडली. सुदैवाने शेतकरी झाडावर चढल्याने या हल्ल्यात थोडक्यात बचावला .
येथील शेतकरी सोमाजी आबाजी फाये हे सकाळच्या सुमारास आपल्या शेळ्या नदी परिसरात चराईसाठी घेऊन गेला होता.अशातच दुपारी बाराच्या सुमारास दबा धरून बसलेल्या लांडग्यांनी अचानक शेळ्यांच्या कळपावर हल्ला चढविला. यात जवळपास सात शेळ्यांचा फडशा पाडला तसेच तीन शेळ्यांना जखमीं केले आहे. येव्हढेच नव्हे तर लांडग्यांनी शेतकऱ्यावर सुद्धा हल्ला चढविला परंतु प्रसंगवधान राखून शेतकरी जवळच्या झाडावर चढल्याने त्याचे प्राण वाचले. येव्हढ्यात परिसरातील शेतकरी धावून आल्याने लांडग्यांनी पळ काढला.

यात सदर शेतकऱ्यांचा जवळपास एक लक्ष रुपयाचे नुकसान झाले आहे. सदर शेतकरी भूमिहीन असून या शेळी पालनवरच त्याच्या उदरनिर्वाह होता. अश्यात लांडग्यांनी शेळ्या फस्त केल्यामुळे सदर वृद्ध शेतकऱ्यांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा ठाकला आहे.वनविभागाला घटनेची माहिती देण्यात आली असून क्षेत्र सहाय्यक कडू यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.

Related posts