गोंदिया: 4 नगर पंचायतीच्या प्रभाग रचना आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम जाहीर..

729 Views

प्रतिनिधि।

गोंदिया. जिल्हयातील सडक अर्जूनी, अर्जूनी, गोरेगाव व देवरी या 4 नगर पंचायतीच्या प्रभाग रचना आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम घोषित करण्यात आला असून तो या प्रमाणे आहे.

21 ऑक्टोबर 2020 रोजी नगर पंचायतीच्या प्रभागाची संख्या, त्यांची प्रभागनिहाय एकूण व अनुसूचित जाती तसेच अनुसुचित जमातीची 2011 च्या जनगणनेनुसार लोकसंख्या, क्षेत्र, सीमांकन, नकाशा, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती आराक्षण यासह प्रारुप प्रभाग रचनेचा प्रस्ताव मुख्याधिकारी यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे सादर करणे. 29 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी प्रारुप प्रभाग रचनेच्या प्रस्तावास मान्यता देतील. 3 नोव्हेंबर रोजी सदस्य पदांच्या आरक्षणाच्या सोडतीकरीता नोटीस प्रसिध्दकरणे. 10 नोव्हेंबर रोजी नगर पंचायतींच्या सदस्य पदांच्या आरक्षणाची सोडत काढणे.

हरकती व सुनावणी

18 नोव्हेंबर रोजी प्रारुप प्रभाग रचना, प्रभागदर्शक नकाशे व सदस्य पदांच्या आरक्षणाची, रहिवाशांच्या माहितीसाठी व हरकती तसेच सूचना मागविणेकरीता वृत्तपत्र व स्थानिक पातळीवर तसेच जिल्हाधिकारी कार्यालय व नगरपंचायतीच्या वेबसाईटवर प्रसिध्द करणे व हरकती व सूचना मागविण्याचा कालावधी. 4 डिसेंबर रोजी प्राप्त हरकती व सूचनांवर सुनावणी देणे. 10 डिसेंबर रोजी हरकती व सूचनांच्या अनुषंगाने अभिप्राय देऊन संबंधित विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नगर परिषद प्रशासन यांचेकडे अहवाल पाठविणे. अधिनियमातील कलम 10 नुसार अंतिम अधि सूचना वृत्त पत्रात व स्थानिक पातळीवर तसेच जिल्हाधिकारी कार्यालय व नगरपंचायतीच्या वेबसाईटवर प्रसिध्द करणे. या कामावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी पेक्षा कमी नसलेल्या दर्जाच्या अधिकाऱ्यांची नेमणूक करतील.

Related posts