गोंदिया: सामाजिक विकास योजनेतंर्गत दोन कोटी रुपयांच्या 21 कामांना मंजुरी, प्रफुल्ल पटेल यांच्या चर्चेनंतर मंजुरी

205 Views

गोंदिया: सामाजिक विकास योजनेतंर्गत दोन कोटी रुपयांच्या 21 कामांना मंजुरी, प्रफुल्ल पटेल यांच्या चर्चेनंतर मंजुरी

प्रतिनिधि।

गोंदिया : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतंर्गत एकूण १.५० कोटी रुपयांच्या २१ कामांना मंजुरी दिली आहे. यामुळे ग्रामीण भागातील रस्ते बांधकामाची समस्या मार्गी लावण्यास मदत होणार आहे. या कामांच्या मंजुरी पत्र संबंधित विभागाने नुकतेच काढले आहे.

खा.प्रफुल्ल पटेल हे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता ठिकठिकाणी गावकरी व शिष्टमंडळाने त्यांच्याकडे समस्या मांडल्या. तसेच विकास कामांची मागणी केली होती. याचीच दखल घेत खा.पटेल यांनी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह चर्चा केली. त्यानंतर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने जिल्ह्यातील २१ कामांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतंर्गत सन २०२१-२२ अंतर्गत मंजुरी दिली आहे.

गोरेगाव तालुक्यातील हौसीटाेला सिमेंट रस्ता बांधकाम ७ लक्ष रुपये, गोवारीटोला येथे सिमेंट नाली बांधकाम, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बाक्टी येथे सिमेंट रस्ता बांधकाम ५ लक्ष रुपये, पिपंळगाव खांबी येथे सिमेंट रस्ता बांधकाम, बुटाई येथे सिमेंट रस्ता बांधकाम, पाथरी येथे मागासवर्गीय वस्तीत सभामंडप बांधकाम, बोंडगावदेवी येथे मिलिंद बौध्द विहार येथे सभामंडप बांधकाम, गोंदिया तालुक्यातील दवनीवाडा येथे सिमेंट रस्ता बांधकाम ८ लक्ष रुपये, दहेगाव येथे सिमेंट नाली बांधकाम, कुडवा येथे सिमेंट रस्ता बांधकाम, हलबीटोला येथे सिमेंट रस्ता बांधकाम, आमगाव तालुक्यातील कालीमाती येथे सिमेंट नाली बांधकाम, भोसा येथे सिमेंट नाली बांधकाम, वडद येथे सिमेंट रस्ता व नाली बांधकाम तिरोडा येथे सिमेंट रस्ता बांधकाम, गोरेगाव तालुक्यातील हौसीटोला येथे सिमेंट नाली बांधकाम तसेच गंगाझरी, झरपडा, टेमनी सिमेंट रस्ता व नाली बांधकामाचा समावेश आहे.

Related posts