गोंदिया: खा. प्रफुल पटेल यांचा कडून केटीएस शासकीय जिला रुग्णालयाला दुसऱ्या टप्प्यात रेमडेसिव्हर इंजेक्शनची की पूर्तता..

269 Views
प्रतिनिधि।
गोंदिया। जिल्हयात कोरोना विषाणूंचा संसर्ग मोठया जोमाने वाढत आहे. रुग्णाच्या संख्येत मोठ्या झपाट्याने वाढ झालेली आहे. या गंभीर आजारमुळे मृतांच्या  संख्येत सुद्धा वाढ होत आहे. मागच्या महिन्यात गोंदिया जिल्ह्यात रेमडेसिव्हर इंजेक्शनचा  शासकीय  रुग्णालयात  व  बाजारपेठेत  तुटवडा  होता. गोंदिया जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवून आणि आरोग्य व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी  मा. श्री. प्रफुलभाई पटेल यांनी रेमडेसिव्हर इंजेक्शनचा तुटवडा बघता गोंदिया जिल्हाल्या रेमडेसिव्हर इंजेक्शन स्वतः कडून देण्याची घोषणा केली होती व त्या घोषणेची पुर्तता  करीत रेमडेसिव्हर इंजेक्शन दि. 27/09/2020 के टी एस शासकीय रुग्णालय गोंदिया यांना जिल्हाधिकारी गोंदिया यांच्या मार्फत देण्यात आले. तसेच आज दि.13/10/2020 ला माननीय खासदार श्री प्रफुल पटेल जी यांच्याकडून रेमडेसिव्हर इंजेक्शन ची दुसरी खेप डॉ. नरेश तिरपुडे , अधिष्ठाता शासकीय वैधकीय महाविद्यालय गोंदिया व डॉ. अमरीश मोहबे, जिल्हा शल्य चिकिसक यांना देण्यात आली.
त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी आमदार श्री राजेंद्र जैन, माजी जि.प.अध्यक्ष श्री विजय शिवणकर, जिल्हाध्यक्ष श्री पंचम बिसेन, श्री नरेश माहेश्वरी, प्रदेश सचिव श्री विनोद हरिणखेडे, शहर अध्यक्ष श्री अशोक शहारे, तालुका अध्यक्ष श्री बाळकृष्ण पटले, तालुका अध्यक्ष श्री कुंदन कटारे आदी उपस्थित होते

Related posts