भंडारा: खा. प्रफुल पटेल यांचा कडून दुसऱ्या टप्प्यात जिल्हाधिकारी भंडारा मार्फत जिल्हा सामान्य रुग्णालयाला रेमडिशिवीर इंजेक्शनची पूर्तता..

279 Views
प्रतिनिधि।
भंडारा।  जिल्हयात कोरोना विषाणूंचा संसर्ग मोठया जोमाने वाढत आहे. रुग्णाच्या संख्येत मोठ्या  झपाट्याने वाढ झालेली आहे. या गंभीर आजारमुळे मरणाऱ्यांच्या संख्येत सुद्धा वाढ होत चाललेली आहे. मागच्या महिन्यात भंडारा जिल्ह्यात रेमडेसिव्हर इंजेक्शनचा शासकीय रुग्णालयात व बाजारपेठेत  तुटवडा होता. भंडारा जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवून आणि आरोग्य व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी खा. प्रफुल पटेल सोबत आरोग्य मंत्री राजेश टोपे, गृहमंत्री अनिल देशमुख,  वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख जिल्हयाचा दौऱ्यावर आलेले होते त्यावेळी प्रफुल पटेल यांनी रेमडेसिव्हर इंजेक्शनचा तुटवडा बघता भंडारा जिल्हाल्या रेमडेसिव्हर इंजेक्शन आपल्या कडून देण्याची घोषणा केली होती.
     त्या घोषणेची पुर्तता (अंमलबजावणी) करीत रेमडेसिव्हर इंजेक्शन दि. 26/09/2020 शनिवारला जिल्हा सामान्य् रुग्णालय भंडारा यांना जिल्हाधिकारी  भंडारा यांच्या मार्फत देण्यात आले होते. तसेच आज दि.12/10/2020 रोज सोमवारला दुसऱ्या टप्प्यात प्रफुल पटेल यांच्याकडून रेमडेसिव्हर इंजेक्शन जिल्हाधिकारी भंडारा मार्फत Civil Surgeon  खंडते व जिल्हा आरोग्य अधिकारी प्रशांत उके  जिल्हा सामान्य रूग्णालयाला देण्यात आली.
   त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष नानाभाऊ पंचबुद्धे, माजी खासदार मधुकर कुकडे, प्रदेश महासचिव धनंजय दलाल, ॲड.विनयमोहन पशिने, यशवंत सोनकुसरे, हेमंत महाकाळकर, गणेश चौधरी इत्यादी उपस्थित होते.

Related posts