जि.प.मध्ये उमेदवार निवडून दिल्यास विकास कामे करणे सोयीचे – माजी आमदार राजेंद्र जैन

359 Views

 

प्रतिनिधि।

सालेकसा। सालेकसा येथे गोपाल तिराले यांच्या निवासस्थानी तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा माजी आमदार राजेंद्रजी जैन, व आमदार मनोहर चंद्रीकापुरे व जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

याप्रसंगी राजेंद्र जैन म्हणाले की, सालेकसा तालुक्यातील मोठ्या प्रमाणात युवकांचा नुतन कार्यकारीणीत सहभाग करुन घ्यावा, या भागांतील जास्तीत जास्त जि. प. व पंचायत समितीचे उमेदवार निवडून आले पाहिजेत, आपण जिल्हा परिषदेत सत्ता दिल्यास डीपीडीसी च्या माध्यमातुन या भागातील आरोग्य सेवा चा दर्जा उंचावण्यासाठी आरोग्य केंद्र, गावातील रस्ते, सहीत अन्य सोयी सुविधा व विकास कामे करण्यात सोयीचे होईल. युवकांच्या प्रगतीसाठी वाव मिळेल.

आमदार मनोहर चंद्रीकापुरे म्हणाले की, अभी तो नापी है जमी मुठ्ठीभर, अभी तो जमी बाकी है असे म्हणत कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या कामाला लागण्याचा इशाराच दिला.

राकांपा जिलाध्यक्ष गंगाधर परशुरामकर म्हणाले की, परिक्षा जवळ आल्यावर अभ्यास जोमाने करावा लागतो, जिल्हा परिषदेची निवडणुक हि आपली परिक्षाच आहे. यात पास होण्यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे.

या कार्यक्रमाला सर्वश्री माजी आमदार श्री राजेन्द्र जैन, जिल्हाध्यक्ष श्री गंगाधर परशुरामकर, श्री देवेन्द्रनाथ चौबे, केतन तुरकर, श्रीमती दुर्गाताई तिराले, श्री गोपाल तिराले, सौ. पूजा ताई वरखडे, श्री चन्द्रपाल पटले, श्री दौलत अग्रवाल, कैलाश धामडे, निकेश गाडव, रोहीत बनोठे, रविन्द्र कटरे, कमलेश लिल्हारे, सिदार्थ शहारे, कवल दासरिया, पारस दासरिया, नरेश कोसरे, जानकीप्रसाद चौधरी, संजय ठाकरे, अभय मोहबे, गरीबदास सलाम, यश बुरले, मोहित वलखेड़े, डिलेश डहारे, कोमल बनोठे, प्रवीण दसरिया, अभय सुलाखे, खुशाल लिल्हारे, अमित मेश्राम, रोहित बंसोड़, रंजीव सुलाखे,संजय बनोठे, सुरेश अग्रवाल, गोपीचंद मुरकुड़े, संजय कोम्बे व अन्य पदाधिकारी , कार्यकर्ता उपस्थित होते.

Related posts