आगामी निवडणुका मध्ये युवकांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष योग्य प्रतिनिधीत्व देईल- मा. आमदार राजेन्द्र जैन

500 Views

 

आमगांव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता मेळावा व नवनियुक्त रा.का.पा. गोंदिया जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर यांचा सत्कार कार्यक्रम संपन्न..

प्रतिनिधि। 21 नोव्हैम्बर

गोंदिया। आज आमगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा व नवनियुक्त राकापा जिल्हाध्यक्ष यांचा सत्कार कार्यक्रम माहेश्वरी इंडस्ट्रीज स्टेशन रोड, रिसामा येथे माजी आमदार श्री राजेंद्रजी जैन, व आमदार श्री मनोहर चंद्रीकापुरे व नवनियुक्त जिल्हाध्यक्ष सत्कार मुर्ती श्री गंगाधर परशुरामकर यांच्या प्रमुख यांच्या उपस्थितीत सभा संपन्न झाली. यावेळी नवनियुक्त जिल्हाध्यक्ष सत्कार मुर्ती श्री गंगाधर परशुरामकर यांचा सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी माजी आमदार राजेंद्र जैन म्हणाले की, तालुक्यातील युवकांच्या कार्यकारीणीचे नुतणीकरण लवकर करणे, युवकांना बुथ कमेटी मध्ये सामावुन घेणे सोबतच युवक व वरिष्ठ पदाधिकारी यांच्या समन्वय साधून पक्ष वाढीवर भर देणे आवश्यक आहे. आगामी काळातील निवडणुका मध्ये युवकांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष योग्य प्रतिनिधीत्व देईल, जि.प. व प.स. निवडणूक महत्वाची असुन जिल्ह्याच्या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला जनतेनी साथ द्यावी असे आवाहन त्यांनी केले.

आमदार मनोहर चंद्रीकापुरे म्हणाले की, पक्ष संघटनेचे कार्य मजबुती ने करण्यासोबतच प्रत्येक बुथ पातळीवर युवकांना स्थान दिले पाहिजे. श्री गंगाधर परशुरामकर म्हणाले की, किसान विरोधी कृषी कायदे मागे घेवुन शेतकर्‍यांच्या अहंकारी सरकार ला जाग आली आहे, हा शेतकर्‍यांच्या एकतेचा विजय आहे. आपल्याला हि भाजपाला वठणीवर आणण्यासाठी एक होवुन येणार्‍या निवडणुकीत भाजपला पराभूत करावा लागेल.

या कार्यक्रमाला माजी आमदार राजेन्द्र जैन, देवेन्द्रनाथ चौबे, नरेश माहेश्वरी, केतन तुरकर, रमेश ताराम, कमलबापु बहेकार, राजेश भक्तवर्ती, सुरेश हर्षे, जियालाल पंधरे, कविता रहांगडाले, चुन्नीलाल डहाके, विनोद कन्नमवार, भारत पोगाटे, तुकडोजी रहांगडाले, रविंद्र मेश्राम, सुमित कन्नमवार, आनंद शर्मा, जयश्री पुड़कर, चुन्नीलाल भलावी, उषाताई हर्षे, मुक्तानंद पटले, प्रमोद शिवनकर, दर्शन बेदी, सिंधुताई भूते, उषाताई डोंगरे, यादव मेश्राम, वंदनाताई बोरसे, पीयूष झा, कान्हा बघेले, लव माटे, दर्पण वानखेड़े, सिमाताई शेंडे, लक्ष्मीताई येडे, सी. के. बिसेन, स्वप्निल कावड़े, रुपाली भक्तवर्ती, जयशीला बोदरे, पल्लवी बोपचे, रेखा बोपचे, कनुकला मडावी, नामदेव दोनोडे, बबलू बिसेन, पोतनभाऊ रहांगडाले, सुनील ब्राह्मणकर, रामचंद ठाकरे, युक्तानंद पटले, विनोद मेहर, शीलाताई चुटे, शालिनी ऊके, वंदना शहारे, वैशाली रामटेके, तुलेंद्र कटरे, प्रशांत गायधने, गिरीश पटले, संजय निमावत, शामलाल सोनवाने, रमन राणे, कृष्णा कोरे, मोतीलाल बागड़कर, भोजराज सोनवाने, रामेश्वर तुरकर, श्रीराम मुनेश्वर, नरेंद्र हरिनखेड़े, देवेंद्र शेंडे, देवेंद्र पटले, दिलीप मानकर, परमेश्वर साखरे, फागुजी ब्राह्मणकर, बाबूलाल ब्राह्मणकर, गोपाल परतेती, पल्लवी बोपचे, सुरेंद्र कोटाँगले, खिलेश बावनथड़े, कैलाश ठाकरे, सुगर्त दोनोडे, इंदिरा कावडकर, दीनदयाल गायधने, दीनदयाल कावडे, हँसराज चुटे, टीकाराम भांडारकर, लखन चुटे, चुन्नीलाल मिश्रा, संजय रहांगडाले, भोलाराम बोपचे, मूलचंद गायधने, हीरालाल ऊईके, कमलेश्वर पधरे, अन्य पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.

Related posts