भारतात फक्त महाराष्ट्रात रब्बी हंगामातील पिकाची खरेदी होत आहे, आम्ही शेतकर्‍यांच्या हितासाठी सदैव प्रयत्नशील – खासदार प्रफुल पटेल

227 Views

 खा. प्रफुल पटेलांचा उपस्थितीत लाखांदूर तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश

प्रतिनिधि।
लाखांदुर। आज चिचोली /अंतरगाव ता. लाखांदुर येथे खासदार प्रफुल पटेल यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नागरी सत्कार व कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला. कार्यक्रम प्रसंगी खासदार प्रफुल पटेल संबोधतांना म्हणाले की, कोरोणा काळात राज्य सरकार आर्थिक संकटात असतांना शेतकर्‍यांच्या हितासाठी सलग दोन वर्षे धानाला बोनस देण्याचा आश्वासन आम्ही पूर्ण केले. भारतात कोणत्याही राज्यात रब्बी हंगामातील पिकांची खरेदी होत नाही पण शेतकर्‍यांच्या हितासाठी आमच्या प्रयत्नांमुळे फक्त महाराष्ट्रात खरेदी होत आहे. दोन्ही जिल्ह्यातील सिंचन क्षमता वाढवण्यासाठी नेहमी सातत्याने प्रयत्न सुरू आहे. गोसेखुर्द धरणाचा पाणी तालुक्यातील शेतकर्‍यांना मिळुन सिंचन क्षमता वाढेल, गोसेखुर्द धरण लवकर पुर्ण व्हावा म्हणून राष्ट्रीय प्रकल्प घोषीत केले पण आताच्या केंद्र सरकारने राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जा काढून घेतला, हा प्रकल्प केंद्र सरकारच्या अपयशामुळे रखडला आहे. कोरोणा काळात जनतेला असुविधा होवु नये यासाठी आँक्सीजन चा पुरवठा करणे, रेमडेशिवीर इंजेक्शन चा तुटवडा निर्माण होवून सुद्धा या जिल्ह्यातील नागरिकांना अडचण होवु नये म्हणून आम्ही इंजेक्शन चा पुरवठा सातत्याने केला. माझी नेहमी भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील जनते विषयी काळजी असते म्हणून कोरोणा संपलेला नाही, दोन्ही लस घेतलेली असेल तरीपण कोराणाची सर्वानी काळजी घ्यावी. तालुक्यातील सर्व नागरिक, कार्यकर्ता व पदाधिकारी यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा श्री पटेल यांनी दिल्यात. या प्रसंगी सर्वश्री खासदार मा.प्रफुल पटेल, मधुकर कुकडे, सुनील फुंडे, नरेश माहेश्वरी, धनंजय दलाल, नरेश दिवटे, बालु चुन्ने, देविदास राऊत, हेमकृष्ण वाडीभस्मे, रामचंद्र कोहळे, अतुल दोनाडकर, मिलींद डोंगरे, कल्पना जाधव, वैशाली हटवार, निमाताई ठाकरे, सुनिता बिसेन, गिता लंजे, बाळा गभणे, शंकर खराबे, मोहन राऊत, प्रमोद प्रधान, राकेश राऊत, संतोष गोधळे, मानबिंधु दहिवले, छगन हेमने, मंगेश ब्राम्हणकर, खेमराज गहाणे, रेशिम परशुरामकर, गोविंदराव बरडे, योगेश ब्राम्हणकर, शुद्धोधन टेम्भूर्णे, बाबा पठाण, नितीन राऊत, मोरेश्वर निमजे,व अन्य उपस्थित होते
या बैठकीप्रसंगी लाखांदूर तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी खासदार श्री प्रफुल पटेल यांचा उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला. खासदार श्री प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वावर व विकासात्मक दृष्टिकोन वर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा स्विकारुन तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला. सर्व प्रवेशितांचे श्री पटेल यांनी पक्षाचा दुपट्टा वापरुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात स्वागत केले.

Related posts