गोंदिया: लसीकरण हेच कवच कुंडल- सरपंच कुलदीप पटले

223 Views

 

प्रतिनिधि।

गोंदिया। कॉविडची दुसरी लाट सर्वांनी अनुभवली आहे, तशी दाहकता जर टाळणे असेल तर आपण लसीकरण करून घेऊन सरंक्षित होणे गरजेचे आहे. आरोग्य विभाग तर्फे मिशन कवच कुंडल व्यापक प्रमाणात राबविण्यात येत आहे. जिल्हाधिकारी डॉ नयना गुंडे यांच्या आवाहन नुसार ग्राम पंचायत गर्रा तर्फे कॉविड लसीकरणाची व्यापक जनजागृती करण्यात आली.

विशेष म्हणजे ग्रर्रा युवा सरपंच कुलदीप पटले स्वतः या मिशन मध्ये सामील झाले आहेत व यांनी पूर्ण ग्रामपंचायत यंत्रणा ची एक विशेष सभा बोलावून सर्व पदाधिकारी यांना एकत्र घेवून ज्या प्रमाणे मत मागण्याकरिता प्रत्येक बूथ प्रमाणे मिशन तैयार केला जातो त्यांच प्रमाणे एक विशेष मुहिम प्रकारे यांनी सर्व पदाधिकारी यांच्या सहकार्यने बुथनिहाय आराखडा बनवून प्रत्येक ज्या नागरिकांनी लस नाही घेतली त्यांच्या घरोघरी जावून त्यांना लस चे फायदे व नुक्सान कडवून व ग्रामपंचायत कडून लस न घेतलेल्या परिवाराना सर्वच ग्रामपंचायत अंतर्गत येणारी सेवा तुन बाहेर ठेवण्यात येईल असे अनेको कड़क निर्बंध लावून 100 टक्के नागरिकांच्या गावकर्यांना लसीकरण करण्यासाठी प्रोत्साहित करीत आहेत.

या कॅम्पेन मध्ये ग्रामसेवक धांडे सर, नोडल अधिकारी वैभव वरखडे, ग्राम पंचायत सदस्य उषाताई बरडे,मिनेस्वरी बाई भगत, मनोज बोरकर,सुरेश कुथिरकर,खुमेश तांडेकर ,गमचंद तुरकर,तंटा मुक्त अध्यक्ष गणेश जी तुरकर,आशा सेविका आशाबाई रहांगडाले, मनीषा भगत मैडम, अंगणवाडी सेविका तुरकर मैडम, पोलिस पाटिल कल्पना बागड़े,राजेश भोयर,पटवारी वरुड़कर मैडम, अंकित बोपचे, उदय ठाकरे, होमेन्द्र टेम्भरे, रंजीत रहांगडाले, पप्पू गौतम, फिरोज दरवडे तसेच लसीकरण स्टाफ 100 टक्के लक्ष पूर्ण करण्यासाठी मेहनत घेत आहेत यांच्या मध्ये महेंद्र मौजे सर,टेम्भरे मैडम,गड़पायले मैडम,जावरकर मैडम,आदी लसीकरण मिशन कवच कुंडल ला सहकार्य करीत आहेत.

Related posts