गोंदिया: 28 नोव्हेंबर ला एकाच दिवशी तब्बल 131 ठिकाणी होणार ‘क्रांतीरत्न’ महाग्रंथाचे प्रकाशन..

306 Views

 

महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीआई फुले यांचे भारतीय समाजावर अनंत उपकार, महात्मा फुले यांचे महापरिनिर्वाण ला 28 नोव्हेंबर ला होणार 130 वर्ष पूर्ण…

गोंदिया। एकोणिसाव्या शतकाला झोपेतून खडबडून जागे करणारे दांपत्य म्हणजे म. ज्योतिराव फुले आणि सावित्रीआई फुले!

मुलींची पहिली शाळा काढणारे, स्त्री शिक्षणाचे उद्गाते, थोर शिक्षण शास्त्रज्ञ, सार्वत्रिक शिक्षणाचा कृतिशील प्रचार,-प्रसार करणारे, बहुजनांच्या गौरवशाली इतिहासाची पुनर्मांडणी करून छत्रपती शिवरायांचा गौरव करणारे, मानवी गुलामगिरीचा विरोध करून समता- स्वातंत्र्य- बंधुता या वैश्विक मूल्यांचा आग्रह धरणारे समाजक्रांतीचे थोर अग्रदूत, सतीप्रथा केशवपन व बालविवाह अशा अनिष्ट रूढींना पायदळी तुडवून विधवा पुनर्विवाहाचा यशस्वी प्रयोग करणारे महान समाजसुधारक, बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू करून बालविधवांचे बाळंतपण करणारे, विधवेच्या बाळाला दत्तक घेणारे, शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडून दुष्काळात अन्नछत्र चालवणारे, भ्रामक धर्मकल्पना धुडकावून लावून सार्वजनिक सत्यधर्माची मांडणी करणारे क्रांतीची मशाल फेकून सर्वंकष मानवमुक्तीच्या महाप्रयोगाचा आरंभ करणारे महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीआई फुले म्हणजे एकोणिसाव्या शतकाला खऱ्या अर्थाने अलंकृत करणारे मानवी रत्नच होत!

महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीआई फुले यांचे जीवन कार्य, विचार सांगणारा एक हजार पानांचा ग्रंथ तयार करून त्यांना मानवंदना देण्याचा प्रयत्न का करू नये, असा विचार आमचे मित्र अपर जिल्हाधिकारी राजेश खवले यांच्या मनात आला. मित्र म्हणून त्यांनी आम्हाला म्हणजे अतुल दोड, राहुल तायडे,विजय लोखंडे, प्रकाश अंधारे, प्रताप वाघमारे, विनय गोसावी, अशोक गेडाम यांना हा विचार बोलून दाखविला. आम्हा सर्वांनाच ही संकल्पना खूप आवडली. ही महत्त्वाकांक्षी संकल्पना साकार करण्याकरिता सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा चंग बांधला. खूप परिश्रमानंतर क्रांतिरत्न महाग्रंथ आकाराला आला आहे. तब्बल १४३ विद्वानांनी महात्मा फुले सावित्रीआई फुले यांचे जीवन-कार्य-विचार यांच्याशी निगडित विविध पैलूंवर लिखाण केलेले आहे. या महाग्रंथाला एकूण 1000 पृष्ठे आहेत.


महात्मा फुले, सावित्रीआई फुले यांनी व्यक्त केलेले विचार, त्यांनी लिहिलेली पुस्तके, त्यांचे जीवन, कार्य या अनुषंगाने विपुल लिखाण आजवर झालेले आहे. तथापि *क्रांतिरत्न महाग्रंथाचे* वैशिष्ट्य म्हणजे या ग्रंथामध्ये महात्मा फुले, सावित्रीआई फुले यांच्याशी निगडित, आतापर्यंत अभ्यास न झालेल्याही अनेक पैलूंचा अभ्यास करून लेख लिहिले आहेत. यामध्ये प्रामुख्याने चार्वाक आणि म. फुले, म. फुले आणि बुद्धांचे तत्वज्ञान, महात्मा फुले यांची भाषाशैली, महात्मा फुले यांची जनसंवाद शैली, परकीय अभ्यासकांनी महात्मा फुले यांच्या कार्याची घेतलेली नोंद, राष्ट्रसंत तुकडोजी यांचे ग्रामगीता आणि महात्मा फुले यांचे विचार, महात्मा फुले यांची संत साहित्य विषयक भूमिका, महात्मा फुले यांचे कार्य व महाराष्ट्रातील आधुनिक अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ, महात्मा फुले यांच्याशी निगडित वास्तू, फुले दांपत्याचे बाल संरक्षणाचे कार्य, महात्मा फुले आणि श्रीमंत सयाजीराव गायकवाड, महात्मा फुले आणि छत्रपती शाहू महाराज,महात्मा फुले यांच्या विचारातील परिवर्तन वाद, महात्मा फुले यांची कलादृष्टी, महात्मा फुले यांची जनसंवाद शैली, महात्मा फुले यांचा मानवतावाद, महात्मा फुले आणि शेतकरी चळवळ, महात्मा फुले यांची काव्यसंपदा, त्यांनी केलेली अखंडादी काव्यरचना, सत्यशोधक समाजाचे सम्यक आकलन, महात्मा फुले यांचा सामाजिक सुधारणा विषयक दृष्टीकोन, सत्यशोधकी नियतकालिके, महात्मा फुले यांच्या नंतरची सत्यशोधक चळवळ, महात्मा फुले यांच्या विचारांची प्रासंगिकता, महात्मा फुले व राष्ट्र संकल्पना, फुलेवाद: मार्क्सपूर्व भारतीय समाजवाद, महात्मा फुले यांचे धर्म विषयक चिंतन, फुलेवाद इतिहासातील नवीन प्रवाह, महात्मा फुले यांचा सत्यशोधक जलशांवरील प्रभाव, महात्मा फुले आणि इस्लाम, महात्मा फुले आणि प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण, विदर्भातील सत्यशोधक जलसे आणि जलसाकार, ‘गुलामगिरी’तील मिथक, उद्योजक महात्मा फुले, महात्मा फुले यांचे सर्वंकष क्रांतीचे तत्वज्ञान, गोविंदराव फुले आणि पेशवाईचा काळ, जोतीराव फुले राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक विचारधारेतील एकसूत्रता, श्रमिकांचे प्रबोधनकार महात्मा फुले, गुलामगिरीतील संस्कृती संघषार्चा अन्वयार्थ, महात्मा फुले आणि भालेकर, महात्मा फुले यांच्या निबंधातील स्त्रीविषयक चिंतन, फुलेवादी नीतिशास्त्र, महात्मा फुले यांची इतिहास मांडणी, महात्मा फुले यांचा निर्मिक कोण?, सावित्रीबाई फुले यांचे कार्य, त्यांच्या काव्यरचना, डॉ. यशवंत यांचे कार्य अशा लेखांचा समावेश आहे. संशोधन, विश्लेषण, तुलनात्मक अध्ययन करून या ग्रंथाकरिता शोधनिबंध लिहिलेले आहेत.

महाराष्ट्रातील विचारवंत, लेखकांनी लेख लिहिलेले आहेत. यामध्ये प्रामुख्याने प्रा. हरी नरके, माजी न्यायाधीश माधांता झोडगे, डॉ. विलास तायडे, अस्मिता मेश्राम, भारत बंडगर, डॉ. माधव हैबतकर, डॉ. रेखा रोडे, डॉ. नामानंद साठे, पुरातत्त्वशास्त्रज्ञ भुजंग बोबडे, डॉ. धोंडोपंत मानवतकर, डॉ. संभाजी खराट, डॉ. स्वप्ना लांडे, डॉ. चंद्रकांत नगराळे, प्रा. दिलीप वानखडे, डॉ. श्याम देवकर, डॉ. मंजुश्री खोब्रागडे, प्रा. आशालता कांबळे, डॉ. कविता मुरूमकर, डॉ. हर्षानंद खोब्रागडे, डॉ. सतीश पावडे, सतीश जामोदकर, प्रदीप कासुर्डे, डॉ. सतीश शिरसाठ, अनिल प्रांजळे, प्रा. पंडित कांबळे, डॉ. संजीवकुमार सोनवणे, भाग्यश्री ओव्हळ, डॉ. गोविंद गायकी, डॉ. आर. जे. इंगोले, डॉ. विनोद खैरे, डॉ. अशोक राणा, डॉ. नरेश इंगळे, तृप्ती नवारे, किरण डोंगरदिवे, लीलाधर दवंडे, विधिज्ञ अशोक गेडाम, डॉ. अरुण शिंदे, डॉ. प्रकाश शिंदे, निखिल परोपटे, मीनाक्षी नागराळे, डॉ. किरण वाघमारे, डॉ. दीपक सूर्यवंशी, डॉ. काशिनाथ उलगडे, रमेश टेंभेकर, प्रतिमा इंगोले, नागेश चौधरी, डॉ. संतोष पेठे, चित्रा पगारे, डॉ. प्रवीण बनसोड, नामानंद साठे, , नीता तिजारे, प्रा. प्रीतम गावंडे, श्याम देवकर, कल्याण श्रावस्ती, प्रा. साजिद शाह, फकीरा राजगुरू, विधिज्ञ प्रज्ञेश सोनावणे, डॉ. तुळशीराम उकिरडे, डॉ. गजानन भिंगारदिवे, अपर्णा ढोरे, डॉ. दीपावली राऊत, प्राचार्य यशवंत खडसे, डॉ. इक्बाल तांबोळी, प्रा. बापूराव डोंगरे, सरिता काळे, गणेश राऊत, सुषमा पाखरे, डॉ. शरद नागरे, प्रा. स्वाती पिंगळे, डॉ अशोक चोपडे, डॉ. दीपक कापडे, डॉ. मिलिंद वाव्हळे, विजय भुयार, डॉ. बालाजी मुंडे, विधिज्ञ विशाखा बोरकर, सुनयना अजात, रूपचंद ख्याडे, डॉ. जयद्रथ जाधव, तनुजा ख्याडे, डॉ. विनोद गायकवाड, प्रिया कदम , डॉ. दशरथ आदे, डॉ. पद्मा नागदेवे, डॉ. पुष्पा तायडे, अक्षय बोराडे, संदीप फुलझेले, डॉ. प्रफुल्ल गवई, डॉ. सुशीलकुमार कुबडे, प्रा. शंकर बागडे, डॉ. बाबासाहेब शेप, प्रा. भूषण हिरभगत, डॉ. स्वाती खोटरे, डॉ. अनिल गायकवाड, अजित कुमार, डॉ. विद्या जाधव, वीरेंद्र गणवीर, डॉ. गजानन डोईफोडे, संजय खरात, प्रा. किशोर चौरे, डॉ. कृष्णा मालकर, श्रद्धा अंबुर्ले , प्रा. दुर्गा भिसे, डॉ. उर्मिला फलफले, विनोद उलीपवार, डॉ. सुधा खडके, डॉ. प्रिययराज महेशकर, डॉ. नारायण बनसोडे, डॉ. किरण कुंभरे, सचिन ओव्हळ, माया गोबरे, गजानन धामणे, प्रा. अर्चना मानकर, डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, नवनाथ रणखांबे, सुरेखा लोणी, प्रा. सविता हजारे, प्रा. सुरेश खोब्रागडे, प्रल्हाद पौळकर, आबिद रेजा, डॉ. श्याम देवकर, डॉ. मनीषा वर्मा, डॉ. सूर्यभान नागुलकर, बाबासाहेब सोनकांबळे, डॉ. श्रीकृष्ण राऊत, डॉ. टी. जी. गेडाम, डॉ. सुधाकर डेहनकर, सुधीर गरड, नीलिमा मुळे, अरुण शिंदे, प्रा. श्रीकृष्ण बनसोड, केदार काळवणे, मनोहर राऊत, शिल्पा भोयर, डॉ. भगवान लोखंडे, डॉ. मीनाक्षी भोयर, डॉ. प्रज्ञा लामतुरे, शिवमती सिंधू तुपकर, जे. ए. उगले, मुकुंदराव पाटील, डॉ. मा. म. जाधव, डॉ. रवी जाधव, प्रवीण गोराडे, निकीता नवले, स्वप्नील रंगारी, बाळासाहेब दास, प्रा. अरुणा वाघोले, बालाजी डिगोळे, प्रा. डॉ. संतोष भोसले, आचल तांबोळी, विजयकुमार लडकत, सुषमा लोखंडे, वैशाली शेंडे, राजेंद्र वाटाणे यांच्यासह मान्यवर लेखकांचे लेख आहेत. येत्या २८ नोव्हेंबर रोजी क्रांतिरत्न ग्रंथाचे प्रकाशन एकाचवेळी १३१ ठिकाणाहून करण्याचे नियोजन या ग्रंथाच्या निर्मिती मंडळाने केलेले आहे.

क्रांतिरत्न ग्रंथाची मूळ संकल्पना *प्रेरणा राजेश खवले* यांची असून डॉ. पुष्पा तायडे या क्रांतिरत्न च्या मुख्य संपादक आहेत. डॉ. सतीश पावडे, डॉ. चंद्रकांत सरदार, सतीश जामोदकर, डॉ. दीपक सूर्यवंशी, प्रकाश अंधारे यांनी सहसंपादक म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेली आहे. अनेक मान्यवरांचे मार्गदर्शन व सहकार्य या ग्रंथाच्या निर्मितीसाठी लाभले आहे. माजी सनदी अधिकारी, तामिळनाडू राज्याचे निवृत्त प्रधान सचिव विश्वनाथ शेगावकर आणि निवृत्त उपजिल्हाधिकारी अशोक गेडाम हे या ग्रंथाचे प्रमुख मार्गदर्शक आहेत. ग्रॅव्हिटी पब्लिकेशनच्या वर्षा राजू चिमणकर यांनी क्रांतिरत्न महाग्रंथ प्रकाशित करण्याकरिता परिश्रम घेतले आहेत. सचिन थेटे यांनी या ग्रंथाचे सुबक मुखपृष्ठ तयार केले असून सुरज कार्ड प्रिंटर्स, नागपूर यांनी या ग्रंथाचे मुद्रण कार्य पार पाडले आहे. ग्रंथालय उपसंचालक सुनील हुसे, जिल्हा उपनिबंधक प्रवीण लोखंडे, संकल्प ग्रुप चालविणारे राजू जाधव , विशालराजे बोरे, विवेक चांदुरकर, प्रवीण मनोहर, श्रीकांत तळोकार, विनायक कांडलकर यांनी समन्वयक म्हणून या महाग्रंथाच्या निर्मितीकरिता परिश्रम घेतले आहेत.
महात्मा फुले, सावित्रीआई फुले यांच्या जीवनातील नवनवीन पैलू उलगडण्यास हा ग्रंथ सहाय्यभूत ठरेल, असा विश्वास क्रांतिरत्न ग्रंथ निर्मिती चमूला वाटतो. *क्रांतिरत्न महाग्रंथ* हा महात्मा ज्योतिराव फुले यांना ग्रंथरूपाने दिलेली एक मोठी मानवंदना ठरणार आहे. आमचे मित्र व मार्गदर्शक उपजिल्हाधिकारी मा . राजेश खवले साहेबांच्या संकल्पनेतून *क्रांतिरत्न महाग्रंथ* हा अजरामर व अक्षर वाड़्‌मय ठरणार असून तो साकार होताना आम्हाला कृतकृत्यतेचं समाधान असून मनस्वी आनंद होत आहे.

28 नोव्हेंबर 2021 रोजी महात्मा फुले यांचे महापरिनिर्वाणाला 130 वर्ष पूर्ण होत आहेत. या बाबीचे औचित्य साधून त्यांना ग्रंथरूपाने आदरांजली वाहण्याकरिता क्रांतिरत्न ग्रंथाचे प्रकाशन एकाच वेळी 131 ठिकाणाहून करण्याचे क्रांतिरत्न निर्मिती मंडळाने ठरविले आहे. ज्यांना आपले गावांमध्ये, शाळा /महाविद्यालयांमध्ये प्रकाशनाचा कार्यक्रम घ्यावयाचा आहे ,त्यांनी क्रांतिरत्न निर्मिती मंडळाचे सदस्य यांच्याशी किंवा मुख्य संपादक प्राचार्या पुष्पा तायडे (9423119221) यांच्याशी संपर्क साधावा ,असे आवाहन करण्यात येत आहे. प्रकाशना करिता लागणारी क्रांतिरत्न महाग्रंथाची प्रत निर्मिती मंडळ द्वारा उपलब्ध करून दिली जाणार आहे. चला तर मग येत्या 28 नोव्हेंबर 2021 रोजी 131 ठिकाणाहून क्रांतिरत्नचे प्रकाशन करून महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीआई फुले यांच्या कार्याला ग्रंथरूपाने मानवंदना देऊया!

आपले स्नेहांकित

प्रकाश अंधारे (8494906992)
विनय गोसावी (9011717180 )
अतुल दोड(8793002424)
प्रताप वाघमारे(9422642842)
विजय लोखंडे(8788986130)
राहुल तायडे(9423847149)
सर्व निर्मिती प्रमुख क्रांतिरत्न महाग्रंथ

Related posts