१५ कोटीच्या निधीतून भंडारा शहरामध्ये साकारणार नाट्यगृह, प्रफुल्ल पटेल यांच्या पाठपुराव्यानंतर पाऊल

309 Views

 

प्रतिनिधि।

भंडारा : भंडारा शहराला ऐतिहासिक तसेच सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. या जिल्ह्यात अनेक थोर साहित्यिक व कलावंत आहेत. मात्र कलावंताना त्यांच्यातील कलागुणांचे दर्शन घडविण्यासाठी व्यासपीठ व मंच नसल्याने मोठी अडचण होत होती. हीच बाब लक्षात घेत खा. प्रफुल्ल पटेल यांनी राज्य सरकारकडे पाठपुरावा केला. त्यानंतर भंडारा येथे अत्याधुनिक दर्जाचे नाट्यगृह तयार करण्यासाठी १५ कोटी रुपयांचा निधीला मंजूर केला आहे. यापैकी पहिल्या टप्प्यात ५० लाखांचा निधी दिला असून उर्वरित निधी लवकरच दिला जाणार आहे.

शहरात नाट्यगृहा अभावि नाट्य प्रेमींसह आयोजकांचा हिरमोड होत होता. शहरात आधुनिक नाट्यगृह तयार व्हावा, अशी शहरवासिय व कलावंताची बऱ्याच दिवसांपासून मागणी होती. पण त्याची कुणी दखल घेतली नव्हती. खा. प्रफुल पटेल यांनी ही बाब गांर्भियाने घेत नाट्यगृहासाठी शासनाकडे पाठपुरावा करून भंडारात आधुनिक नाट्यगृह मंजूर करवून घेतले.

यासंदर्भात खा. पटेल यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह नुकतीच बैठक घेतली होती. यासाठी लागणार निधी सुध्दा नगर विकास मंत्रालयाकडून मंजूर करुन घेतला आहे. नगर परिषदांना वैशिष्टपुर्ण कामासाठी शासनाकडून विशेष अनूदान देण्यात येते. नगर परिषदांना वैशिष्टपुर्ण कामासाठी विशेष अनूदान या योजनेअंतर्गत भंडारा शहरात आधुनिक नाट्यगृह बांधकामाला मंजूरी देण्यात आली. याकरीता शासनाने ५० लक्ष रूपये प्राथमिक कार्यासाठी मंजूर करण्यात आले. खा. प्रफुल पटेल यांनी शासनाकडे पाठपुरावा केल्याने शासनाने बंधिस्त नाट्यगृह मंजूर केले. यामुळे शहरवासियांना सांस्कृतिक कार्यक्रमांसह अन्य कार्यक्रमांकरीता नाट्यगृह सोयीचे होणार असल्याने खा. प्रफुल पटेल यांचे सर्वच स्तरातून स्वागत केले जात आहे.

Related posts