गोंदिया: भारतीय बौद्ध महासभेच्या तालुका अध्यक्षपदी देवानंद शहारे यांची नियुक्ती

127 Views

 

गोंदिया, दि.5 : भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर यांचे सोमवार, 4 आॅक्टोबर रोजी गोंदियात आगमन झाले. त्यांच्या मार्गदर्शनात शासकीय विश्रामगृह गोंदिया येथे भारतीय बौद्ध महासभेची गोंदिया जिल्हा कार्यकारिणी गठित करण्यात आली. तसेच गोंदिया जिल्ह्यातील आठही तालुक्यासाठी तालुका अध्यक्षांच्या नावांची घोषणा करून त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.

यात तिरोडा तालुका अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते तथा न्यूज पोर्टलचे मुख्य संपादक देवानंद शहारे यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर यांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र देण्यात आले.
याप्रसंगी प्रामुख्याने भारतीय बौद्ध महासभेचे अनिल जवादे, जिल्हा कार्यकारिणी अध्यक्ष महेंद्र मेश्राम, जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी तसेच इतर मान्यवर व जिल्हाभरातून आलेले धम्मबांधव-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी लवकरच भारतीय बौद्ध महासभेची तिरोडा तालुका कार्यकारिणी गठित करण्यात येणार असल्याचे तालुका अध्यक्ष देवानंद शहारे यांनी सांगितले.
भारतीय बौद्ध महासभेच्या तिरोडा तालुका अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल देवानंद शहारे यांचे तिरोडा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हुपराज जमाइवार, उपाध्यक्ष नागपुरे, सचिव विजय खोब्रागडे, मार्गदर्शक लक्ष्मीनारायण दुबे, मुकेश अग्रवाल, नितीन आगाशे, निलू साकुरे, कमल कापसे, डी.आर. गिरीपुंजे, पंकज देहलीवाल, अजय नंदागवळी, अमरदीप बडगे, हितेंद्र जांभूळकर, हितेश रहांगडाले, प्रदीप शहारे, स्वप्नील शहारे आदींनी अभिनंदन केले. तसेच महाप्रज्ञा बुद्ध विहार समिती तिरोडाचे अध्यक्ष अतुल गजभिये, इंजिनियर रवी राऊत, अॅड.दुर्वास रामटेके, प्रा.लेखानंद राऊत, संजय श्यामकुवर, शैलेन्द्र कोचे, पवन वासनिक, जयप्रकाश जांभूळकर, निशांत बंसोड, मुकेश राऊत, प्रशांत तिरपुडे, सचिन तिरपुडे आदि समाजबांधवांनी अभिनंदन केले.

भारतीय बौद्ध महासभेविषयी थोडक्यात…

भारतीय बौद्ध महासभा (The Buddhist Society of India) हे भारतीय बौद्धांचे राष्ट्रीय संघटन आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी याची स्थापना 4 मे 1955 रोजी मुंबई, महाराष्ट्र येथे केली होती. 8 मे 1955 रोजी बॉम्बेच्या नरे पार्क येथे आयोजित एका समारंभात डॉ.आंबेडकर यांनी बौद्ध धम्माच्या प्रचार-प्रसारासाठी या संघटनेच्या स्थापनेची औपचारिक घोषणा केली होती.

या संघटनेचे मुख्यालय मुख्यालय मुंबई येथे असून राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून राजरत्न आंबेडकर कार्य करीत आहेत. ‘भारतीय बौद्ध महासभा’ हे आंतरराष्ट्रीय बौद्ध संघटन ‘वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्ट्स’चा सदस्य आहे. त्यामुळे भारतीय राज्यांतील अनेक बौद्ध अनुयायी सदस्य म्हणून भारतीय बौद्ध महासभेशी जुडलेले आहेत.

भारतीय बौद्ध महासभेचे उद्देश्य, भारतात बौद्ध धम्माचे प्रसारास प्रोत्साहन देणे, बुद्ध संदेशासाठी विहार स्थापित करणे, धार्मिक व वैज्ञानिक विषयांसाठी शाळा व कॉलेजांची स्थापना करणे, अनाथालय, रुग्णालय व मदत केंद्रांची स्थापना करणे, बौद्ध धम्माचे प्रसार करणार्‍या लोकांच्या तयारीसाठी बुद्धिस्ट सेमिनार सुरू करणे, सर्व धर्मांच्या तुलनात्मक अध्ययनास प्रोत्साहन देणे, बौद्ध धम्माच्या प्रकाशनाला आणि मोठ्या प्रमाणात बौद्ध धम्माची वास्तविक समज देण्यासाठी पुस्तिका-पुस्तक जारी करणे, प्रकाशनाचे काम समोर वाढविण्याच्या उद्देशासाठी एक किंवा अनेक प्रेस स्थापित करणे सामान्य कार्यवाहीसाठी व फेलोशिप स्थापित करण्यासाठी भारतीय बौद्धांची सभा व संमेलन आयोजित करणे आदि अनेक बाबींचा समावेश आहे.

Related posts