उ.प्र. च्या लखीमपुर खीरी हिंसाचाराचा जिल्हा काँग्रेस कडून निषेध, केंद्रिय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा, उ.प्र.चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, यांना पदावरुन बडतर्फ करण्याची मागणी

135 Views

 

जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन…

गोंदिया –
उतरप्रदेश च्या लखीमपुर खीरी जिल्हयातील केंद्रिय गृहराज्य मंत्री अजय मिश्रा टेनी यांच्या बनबीरपुर गावा मध्ये उ . प्र . चे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या कार्यक्रमाचा विरोध करण्यासाठी हातात काळे झंडे चे घेऊन निदर्शने करणाऱ्या शेतकऱ्यांवर केंद्रियमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा उर्फ मोनु यांनी जीपगाडी चढवून चार शेतकऱ्यांना चिरडले . त्यामुळे हिंसाचार भडकला व तीन वाहनांना आग लावण्यांत आली.

भारतीय जनता पार्टीचे नेते नेहमी भडकाऊ वक्तव्य करित असतात. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला बदनाम करुन आंदोलन उधळून काढण्याचा प्रयत्न सतत करित असतात, गत 11 महिण्यापासून दिल्लीच्या सिमेवर आंदोलन करित असलेल्या शेतकऱ्यांशी बोलणी करण्यास सरकारकडे वेळ नाही . भाजप नेते समर्थकाकरवी हिंसाचार घडवून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला जात आहे . लखीमपुर खीरी येथील हिंसाचारात झालेल्या शेतकऱ्यांच्या कुंटुबियाची सात्वना भेट घेण्यास जात असलेल्या अखिल भारतीय काँग्रेस कमिटी महासचिव प्रियंका गांधी यांना यु.पी. शासनाव्दारे अटक करण्यांत आली. त्यांना जाऊ दिले नाही ..

उपरोक्त हिसांचाराचा व प्रियंका गांधी यांच्या अटकेचा निषेध गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटी द्वारे निदर्शने करुन करण्यांत आला व दोषींवर कारवाई व्हावी तसेच केंद्रिय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा व उ.प्र.चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पदावरुन बडतर्फ करण्याची मागणी महामहिम राष्ट्रपती व प्रधानमंत्री यांचे कडे जिल्हाधिकाऱ्यां मार्फत निवेदन देऊन करण्यांत आली .

यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ . एन.डी. किरसान , प्रदेश सचिव अमर वराडे , प्रदेश सचिव पी.जी. कटरे , किसान काँग्रेस अध्यक्ष जितेश राणे , शहर अध्यक्ष जहिर अहमद , तालुका अध्यक्ष सुर्यप्रकाश भगत , ओबिसी सेल अध्यक्ष जितेन्द्र कटरे , अनु . जाती विभाग अध्यक्ष अमित भालेराव, अमर राहुल दलेश नागदवने , निलम हलमारे , गणेश हुकरे, एस. आर . निनावे , जिवनलाल शरणागत, हंसराज गयगये, निकेश ( बाबा ) मिश्रा, गौरव बिसेन , श्रीकांत साखरे, रविकुमार क्षिरसागर, अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते.

Related posts