जिल्हा काँग्रेस कमिटीने भारत बंद च्या समर्थनार्थ केला गोंदिया जिल्हा बंद

169 Views

 

प्रतिनिधि।

गोंदिया। देशातील जनतेला भरमसाठ खोटी आश्वासने देऊन सत्तेत आलेल्या भाजपच्या हुकुमशाही राजवटीने देशाची आर्थीक स्थिती पुर्णत: ढासळवलेली आहे. शेती व शेतकरी विरोधी तीन काळे कायदे रद्द करावे या साठी जगाचा पेशिंदा गेल्या 11 महिन्यांपासून दिल्लीत ठाण मांडून बसलेला आहे, तरी या जुलमी सरकारला त्यांची कीव येत नाही. उलट त्यांचा क्रूर पध्दतीने छळ केला जात आहे. तसेच केंद्रातील मोदी सरकारने या देशातील सर्व सरकारी यंत्रणा ताब्यात घेऊन देश बर्बादीचा घाट घातला आहे.

देशातील सर्व सार्वजनिक उपक्रम जसे रेल्वे, बँका, विमानसेवा , रस्ते, विमा कंपन्या, सार्वजनिक उद्योग, दुरसंचार आणि बंदरे इत्यादी एक – एक करुन विकत आहे. अलिकडेच विक्री झालेल्या बंदरातून मोठया प्रमाणात तस्करी झाली आहे. अदानीच्या मालकीच्या गुजरातमधील मुंद्रा बंदरातून 21 हजार कोटी किंमतीच्या ड्रग्जची तस्करी सापडली आहे. अशा अंमली पदार्थांच्या तस्करीतून देशातील तरुणाई मोदी सरकार संपवायला निघाले आहे. तरुणांना दरवर्षी 2 कोटी नोकऱ्या देऊ असे आश्वासन देणाऱ्या भाजप सरकारने असलेल्याही नोकऱ्या संपुष्टात आणल्या आहेत. या अशा मार्गाने देशातला तरुण बेरोजगार करुन त्याला देशोधडीला लावण्याचा प्रयत्न मोदीच्या कटकारस्थानी सरकारकडून सातत्याने त्याचप्रमाणे दिवसेंदिवस कृत्रिम महागाई निर्माण करुन अदानी – अंबानी सारख्या उद्योगपत्यांचे खीसे भरण्याची खेळी मोदी सरकारकडून सुरु आहे. या महागाईच्या झळीत सर्वसामान्य जनता होरपळून निघाली आहे.

एकीकडे खोटया विकासाच्या मोठमोठया गप्पा मारायच्या आणि दुसरीकडे महागाई वाढवून, देशातल्या सर्व संवैधानीक संस्था ताब्यात घेऊन सार्वजनिक संस्था विकून शेतकरी व सर्वसामान्यांना देशोधडीला लाववण्याचे पाप भाजप सरकार करीत आहे. डिजेल, पेट्रोल, गॅस सह इतर जिवनावश्यक वस्तुंची महागाई गगणाला भिडलेली असतांना त्यापासून लोकांची सुटका करण्याऐवजी भाजप सरकार हिंदु मुस्लीम अंजेडा चालवित आहे. कामगारांना बरबाद करणारे कायदे केले आहेत. पॅगसस व्दारे प्रतीष्ठित भारतीय लोकांची जासुसी करुन त्यांचे स्वांतत्र्य हिरावून घेण्याचे काम करीत आहे. ओबीसी च्या आरक्षणासाठी न्यायालयात सादर करण्यासाठी ज्या इंपीरीकल डाटाची गरज आहे. तो डाटा केंद्र सरकार कडे असुन सुध्दा तो देण्यास मोदी सरकारचा नकार आहे. सर्वच बाबतीत मोदीसरकार जनविरोधी कार्यक्रम चालवित आहे. या जुलमी व अत्याचारी भाजप सरकारच्या विरोधात देशातील सर्व शेतकरी संघटना, डाव्या आघाड्यांनी तीव्र आवाज उठविला असून, सोमवार दि. 27 सप्टेंबर 2021 रोजी भारत बंद केला गेलेला आहे. यावेळी गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीचे व्दारे 27 स्पटें. रोजी गोंदिया, गोरेगांव, तिरोडा, स.अर्जुनी , मोर.अर्जुनी, आमगांव, देवरी, सालेकसा, या आठही ही तालुक्यात बंद पाठण्यात आला.

या मध्य सर्व जिल्हयातील सर्व काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते सक्रिय रितीने सहभागी झाले होते. गोंदिया येथे गोंदिया जिल्हा कॉंग्रेसच्या वतीने येथे बंद पाळण्यांत आला. व गोंदिया येथे गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने राष्ट्रपती महोदयाना निवेदन पाठविण्यासाठी उपविभागिय अधिकारी, यांना देण्यात आले. निवेदन देतांना काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.एन.डी. किरसान, प्रदेश सचिव अमर वराडे, व पी.जी.कटरे, गोंदिया शहर अध्यक्ष जहिरभाई अहमद, तालुका अध्यक्ष सुर्यप्रकाश भगत, ओबिसी सेल अध्यक्ष जितेन्द्र कटरे, किसान काँग्रेस अध्यक्ष जितेश राणे, अमित भालेराव, अमर राहुल, तालुका महासचिव रंजित गणविर, निलम हलमारे, दिपक उके, सिध्दार्थ गणविर, आंनद लांजेवार, महेश मरस्कोले, गौरव बिसेन पवन नागदेवे, दलेश नागदवणे, विजेन्द्र बोरुडे, देवचंद कुंभलकर, अरुण गजभिये, आदिल पठाण, चमनलाल बिसेन, चंद्रकुमार बागडे, जिवनलाल शरणागत, अनेक काँग्रेस पदाधिकारी, व कार्यकर्ते होते.

Related posts