गोंदिया: शेतकरी विरोधी कृषी कायदेे तातडीने रद्द करून देशातील शेतकऱ्यांना न्याय द्या, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भारत बंद समर्थनार्थ मागणी

302 Views

 

प्रतिनिधि।

गोंदिया। आज गोंदिया येथे केन्द्र सरकार द्वारा पारित शेतकरी विरोधी कृषी कायद्यांच्या विरोधात परमपूज्य डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेजवळ, प्रशासकीय इमारत समोरील पटांगणात माजी आमदार श्री राजेंद्र जैन,यांच्या नेतृत्वात भारत बंद समर्थनार्थ धरणे देण्यात आले. तत्पश्चात उपविभागीय अधिकारी यांना राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाद्वारे निवेदन देण्यात आले. निवेदनात शेतकऱ्यांची दिशाभुल करून देशातील कोणत्याही शेतकरी संगठना, शेतकरी नेते किंवा प्रमुख विपक्ष पक्षांना विश्वासात न घेता, मागील वर्षी माहे सिंतबर 2020 मध्ये भारतीय संसदेत तिन शेतकरी विरोधी कृषी कायद्यांना मंजुरी देण्यात आली आहे. या तिन्ही कायद्यांवर लोकसभेत कोणत्याही प्रकारची चर्चा न करता मसुदा पारीत करण्यात आला.

जेव्हा देशातील शेतकऱ्यांनी या कायद्याचे अवलोकन केले असता शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाला हमी भावाचा (फसल समर्थन मुल्य) समावेश नसल्याचे लक्षात आले. यात शेतकऱ्यांची मोठी प्रमाणात फसवणुक करण्यात आली आहे. तेव्हा पासुन देशातील विविध शेतकरी संघटना मागील 1 वर्षा पासुन केन्द्र सरकारच्या विरोधा मध्ये मोठ्या प्रमाणावर आंदोलन करीत आहेत. परंतु आजपर्यंत केन्द्र सरकारनी यावर तोडगा काढलेला नाही.

एकीकडे वाढत्या रासायनीक खताचे भाव, किटकनाशकाचे भाव, डिजेल-पेट्रोल चे भाव, जिवनावश्यक वस्तुचे भाव, शेतकऱ्यांना लागणारे कृषी अवजारे व अन्य साहित्याचे भाव, यामुळे शेतकऱ्यांना शेती परवडणारी राहिलेली नाही.

भाजपाने सन 2014 च्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकी मध्ये कृषी उत्पादन खर्चाचे आधारावर ढिडपट भाव देण्याची घोषणा केली होती. ही घोषणा तर पूर्ण केली नाहीच उलट नविन कृषी कायद्यांत सध्या देण्यात येणाऱ्या हमीभावाची अट सुध्दा काढून टाकलेली आहे.त्यामुळे या देशातील विविध प्रकारची पिके घेणारा शेतकरी पुढील काळात देशोधळीला लागल्या शिवाय राहणार नाही. त्यामुळे आपण पारीत केलेल्या तिन्ही कृषी कायद्यांचा गोंदिया जिला राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी कडाडून विरोध करीत असुन हे कृषी कायदे तातडीने रद्द करावे. अशी मागणी महामहिम राष्ट्रपती, व माननीय प्रधानमंत्री,भारत सरकार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा च्या वतीने करण्यात आली.

यावेळी माजी आमदार श्री राजेंद्र जैन, विनोद हरिणखेडे, गंगाधर परशुरामकर, अशोक सहारे, देवेंद्रनाथ चौबे, विशाल शेंडे, सतीश देशमुख, विनीत सहारे, सुनील भालेराव, राजू एन जैन, रफिक खान, हेमंत पंधरे, मनोहर वालदे, केतन तुरकर, चुन्नीभाऊ बेदरे, जगदीश बहेकार, नानू मुदलियार, खालिद पठाण, वीरेंद्र जैस्वाल, अजय हलमारे, लता रहांगडाले, रजनी गौतम, उषा मेश्राम, सोनम मेश्राम, शैलेश वासनिक, सुनील पटले, नागरतन बन्सोड, गंगाराम बावनकर, सय्यद इकबाल, सुनील तिवारी, बंटी मिश्रा, सि. के. बिसेन, सतीश पारधी, सौरभ रोकडे, एकनाथ वहिले, अक्की अग्रहरी, हरगोविंद चौरासिया, नागो बन्सोड, राजू रय्यानी, पवन धावडे, रमेश बावणथळे, महेश करियार, रमण उके, दिलप्रीत होरा, कान्हा बघेले, नितिन टेम्भरे, कृष्णा भांडारकर, पुरण उके, लव माटे, कपिल बावणथळे, पिंटू कटरे, हर्षवर्धन मेश्राम, रमेश ठवरे, योगेश डोये, बोधानंद गुरुजी, विक्की बाकरे, दर्पण वानखेडे, बिट्टू बिसेन, प्रतीक पारधी, असावील कुरेशी, निरंजन हतकय्या, मंगेश रंगारी, अरविंद गणवीर, प्रतीक बन्सोड, महेंद्र लिल्हारे, आकाश मेश्राम, दिलीप डोंगरे, कुणाल बावणथळे, रवी तुपटे, बंसीधर अग्रवाल, बालू कोसरकर, रौनक ठाकूर, नरेंद्र बेलगे सहित अन्य कार्यकर्ता व शेतकरी उपस्थित होते.

Related posts