गोंदिया: पोकळ आश्वासन देऊन विसरुन जाणार्‍या पैकी आम्ही नाही, जे बोलतो ते पुर्ण करतोच – खासदार श्री प्रफुल पटेल

175 Views

 

प्रतिनिधि। 17 सितम्बर

गोंदिया। आज गोंदिया तालुक्यातील ग्राम गर्रा खुर्द येथे खासदार श्री प्रफुल पटेल यांच्या उपस्थितीत श्री गणेश बरडे यांच्या निवासस्थाना समोरील पटांगणावर पक्ष पदाधिकारी बैठक संपन्न झाली. परिसरातील कार्यकर्ता व नागरिकांनी श्री पटेल यांच्या सोबत विविध समस्यांवर सविस्तर चर्चा केली. विकासाच्या दृष्टिकोनातून पाहता गोंदियाचा विकास फक्त राष्ट्रवादी काँग्रेसच्याच माध्यमातून झालेला आहे, पोकळ आश्वासन देऊन विसरुन जाणार्‍या पैकी आम्ही नाही, जे बोलतो ते पुर्ण करतोच असे संबोधन खासदार श्री प्रफुल पटेल यांनी केले.

खा. श्री पटेल पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांना सलग दोन वर्षे बोनस देण्याचे आश्वासन पूर्ण केले. कोवीड संक्रमणाच्या काळात गोंदिया – भंडारा जिल्ह्यातील जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून आँक्सीजन, इन्जेक्शन व औषधी चा साठा कमी पडु नये यासाठी प्रयत्न केले. गोंदिया सुजलाम सुफलाम होण्यासाठी व जल सिंचनासाठी प्रयत्न सुरू आहे. काटी- रजेगाव प्रकल्प लवकरच सुरू होऊन शेतकर्‍यांना शेतीच्या सिंचनासाठी फायदा होईल. आम्ही जनतेची सहानुभूती घेण्यासाठी विरोधकांसारखे आंदोलनाचा देखावा करीत नाही आणी संकटाच्या वेळी अदृश होत नाही, असे प्रतिपादन श्री खासदार प्रफुल पटेल यांनी केले.

या वेळी सर्वश्री माजी आमदार राजेंद्र जैन, जिल्हाध्यक्ष विजय शिवणकर, देवेंद्रनाथ चौबे, विनोद हरिणखेडे, गणेश बरडे, कुंदन कटारे, बाळकृष्ण पटले, केतन तूरकर, विशाल शेंडे, रजनी गौतम, मायाताई कोल्हे, उषाताई बरडे, गोविंद तुरकर, कुलदीप पटले, आशिष मिश्रा, प्रेमलाल काटेवार, घनश्याम मस्करे, मनोज दहीकर, चंदन गजभिये, महेंद्र गेडाम, शैलेश वासनिक, सुनील पटले, खेमराज बागडे, माणिकचांद मशे, पंकज तुरकर, विक्रांत तुरकर, उषा मेंढे, अशा चौधरी, गीता बावनकर, राजू येडे, झनक रहांगडाले, ताराचंद धावडे, ढंगानीराम मदनकर, ओकार वाघाडे, सुकूनबाई उके, श्रावण बरडे, सेवकराम बरडे, सदाशिव बरडे, ताराचंद धावडे, धनीराम मदन, करणलाल येडे, श्यामराव लांजेवार, सुरजलाल बोपचे, गणेश तुरकर, गोधन खांदेवाहे , शिलाताई तिघारे, सरिता तांडेकर, रेखाबाई कोल्हे, तेजरं येडे, कैलास खोब्रागडे, राजू गौतम, महेंद्र गेडाम, जगदीश तांडेकर, बहादूर सिंग यादव, रमेश चौहान, महेंद्र लांजेवार अन्य उपस्थित होते.

या बैठकीप्रसंगी खासदार श्री प्रफुल पटेल यांच्या उपस्थितीत गर्रा खुर्द परिसरातील श्री महेश चौधरी, श्रीमती आशा चौधरी, डॉ बावनकर, श्री गुलाब पंधरे, श्री रमेश कटरे, यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.श्री प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वावर व विकासात्मक दृष्टिकोनावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला. यावेळी श्री पटेल यांनी सर्व प्रवेशितांचे पक्षाचा दुपट्टा वापरुन स्वागत केले.

Related posts