गोंदिया येथे स्वराज्य ध्वज यात्रेचे माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांच्या उपस्थितीत ध्वज पूजन

264 Views

 

प्रतिनिधि।

गोंदिया। आज गोंदिया येथे ऊर्जा, शक्ती, निष्ठा, संयम, आनंद, प्रगती, त्याग, संघर्ष व समतेचे प्रतीक असलेल्या स्वराज्य ध्वज यात्रेचे राष्ट्रवादी कांग्रेस च्या वतीने माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांनी स्वराज्य ध्वजाला अभिवादन करून पूजन केले. यात्रेचे मुख्य समन्वयक श्री नानाजी गवळी, श्री नितीन खंमगर, श्री ऋषीकेश करभजन, श्री पंकज लोखंडे, श्री रामदास तुताले, यांचे पुष्पगुछ देऊन स्वागत केले.

या यात्रेची सुरवात कर्जत जामखेड येथून ०९ सप्टेंबर २०२१रोजी संत गोदळ महाराज यांच्या पावन भूमीतुन सुरुवात करण्यात आली. हि यात्रा संपूर्ण महाराष्ट्र मधून ३६ जिल्ह्यातील देव – देवता व तीर्थस्थल, गडकिल्ले या ठिकाणी फिरणार आहे. स्वराज्य ध्वज यात्रेचे शेवट महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत विठठल रुख्मिणी मंदिर पंढरपूर येथे होणार आहे.

यात्रेच्या माध्यमातून नवयुवकांनी एकत्र येऊन देशासाठी काम करावे, त्यांचे आचार विचार चांगले राहावेत युवा पिढीला इतिहासाची जाणीव असावी ह्या हेतूने हि स्वराज्य ध्वज यात्रा निघाली आहे. शरद पवार, प्रफुल पटेल, अजीत पवार, जयंत पाटील, आमदार रोहित पवार, यांच्या संकल्पनेतून हि यात्रा महाराष्ट्र भर फिरणार आहे.

या स्वराज ध्वज पुजन प्रसंगी माजी आमदार राजेंद्र जैन, अशोक शहारे, सतीश देशमुख, विनोद पंधरे, सचिन शेंडे, केतन तुरकर, राजू एन जैन, लता रहांगडाले, प्रतीक भालेराव, जिमी गुप्ता, विनायक शर्मा, मोहित गौतम, कपिल बावणथळे, सौरभ जायस्वाल, महेश करियार, रमण उके, सौरभ रोकडे, नागो बन्सोड, पिंटू कटरे, लखन बहेलिया, कुणाल बावणथळे, दर्पण वानखेडे, अमन घोडीचोर, मंगेश रंगारी, सहित राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.

Related posts