युवक-युवतींनी अधिकारी होण्याचे ध्येय निश्चित करावे – एसडीपीओ नितीन यादव

186 Views

 

सहभागी 100 प्रशिक्षणार्थींना अदानी पावरचे वतीने ट्रॅक सूट किट वितरण…

प्रतिनिधि ।

तिरोडा। पोलीस विभाग गोंदिया व अदानी फाउंडेशन तिरोडा यांच्या संयुक्त विद्यमाने मागील तीन वर्षापासून गोंदिया जिल्ह्यातील युवक-युवतीं करिता पोलिस /सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षण कार्यक्रम पोलीस उपविभागीय अधिकारी नितीन यादव यांच्या प्रयत्नाने राबविला जात आहे.

दिनांक 6 सप्टेंबर रोजी सदर कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षणामध्ये सहभागी 100 प्रशिक्षणार्थींना अदानी पावर प्रमुख कांती बीश्वास यांच्या मार्गदर्शनाखाली नितीन यादव पोलीस उपविभागीय अधिकारी व सौ यादव मॅडम यांच्या हस्ते तसेच अदानी पावर चे एच.आर. हेड हरिप्रसाद अडथळे, अदानी फाउंडेशन हेड नितीन शिराळकर, अदानी पावरचे सुरक्षा प्रमुख गजेंद्र सिंह शेखावत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ट्रॅक सूट किट वितरण करण्यात आले.

याप्रसंगी प्रास्ताविकपर भाषणात श्री नितीन शिराळकर यांनी पोलिस सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षण कार्यक्रम हा पोलीस उपविभागीय अधिकारी श्री नितीन यादव यांचीच संकल्पना असून त्यांच्याच प्रयत्नांमुळे जिल्ह्यातील युवक-युवतींना याचा लाभ मिळत आहे असे सांगितले.
श्री नितीन यादव यांनी उपस्थित प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करताना पोलीस विभागामध्ये अधिकारी होण्याचे ध्येय उराशी बाळगा असा मोलाचा सल्ला दिला. याप्रसंगी श्री हरिप्रसाद अडथळे व गजेंद्र सिंग शेखावत यांनीसुद्धा प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार अदानी फाउंडेशन चे प्रकल्प अधिकारी श्री राहुल शेजव यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशिक्षक श्री प्रशांत कावळे व सचिन बिसेन यांनी परिश्रम घेतले.

Related posts