धानाचे चुकारे, बोनस मिळण्याकरिता व विद्युत पुरवठा खंडित न करण्याकरिता डॉ.आ.परिणय फुके यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी यांना निवेदन…

259 Views

 

प्रतिनिधि।

भंडारा: शेतक-यांच्या खरीप धानाचे बोनस व रब्बी धानाचे चुकारे अजुन पर्यंत शेतक-यांच्या खात्यात जमा न झाल्याने शेतकरी हवालदिल झालेला आहे.
धानाची उचल वेळेवर न झाल्यामुळे शेतक-यांच्या धानाचे फार नुकसान झाले आहे. यावर्षीचा खरीप हंगाम सुरू होण्यापुर्वी शेतक-यांना रब्बी हंगामातील धानाचे चुकारे न मिळाल्यामुळे सावकराकडून कर्ज घेऊन शेतातील मशागतीचे कामे यावेळी शेतक-यांना करावे लागले आहे, ही फार मोठी शोकांतिका आहे. त्यातच पाऊस पडत नसल्याने धान जगवण्यासाठी शेतकरी मोटरपंप लावून धानाला जगवत आहे. पण त्यातही शासनाच्या आडमुठीपणामुळे विद्युत विभाग बिल न भरल्यामुळे शेतक-यांचे विद्युत कनेक्शन कापत आहे. त्यामुळे जगाचा पोशिंदा असलेल्या शेतक-यांने जगावे कसे असा प्रश्नचिन्ह त्यांच्यापुढे निर्माण झालेला आहे.

याबाबत आज दि.२७ ऑगस्ट २०२१ रोजी जिल्हाधिकारी, भंडारा यांची आमदार डॉ परिणय फुके यांनी भेट घेऊन शेतकऱ्यांच्या धानाचे चुकारे व बोनसचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करून विद्युत कनेक्शन ना तोडण्याबाबतचे निवेदन दिले.

यावेळी जिल्हाध्यक्ष श्री शिवरामजी गिरेपुंजे, माजी खासदार श्री शिशुपालजी पटले, श्री राजेशजी बांते, श्री मुन्नाजी फुंडे, श्री संजयजी कुंभलकर, श्री रुब्बीजी चड्डा, श्री आशुभाऊ गोंडाने, श्री विनोदजी बांते, श्री निलकंठजी कायते, श्री चंद्रप्रकाशजी दुरुगकर, श्री निशीकांतजी इलमे, श्री धनंजयजी घाटबांधे, श्री बबलूजी आतिलकर, श्री महेंद्रजी निंबार्ते, श्री अमितजी वसानी, श्री नितीनजी कढव, श्री विष्णूजी हटवार, श्री निखाडे जी, श्री गुणवंतजी पुडके, श्री मिलिंदजी मदनकर, श्री संतोषजी वहिले, श्री हितेंद्रजी पौणिकर, श्री सत्यवानजी वंजारी , श्री गणेशजी निरगुडे, श्री सुधाकरजी हटवार, श्री महेशजी आकरे, श्री देवेशजी नवखरे, श्री पप्पूजी भोपे, श्री उमेशजी मोहतुरे, श्री संदीपजी भांडारकर, श्री रोशनजी ठवकर, श्री पंकजजी सपाटे, श्री प्रशांतजी ढोमणे, श्री होमेन्द्रजी भोयर, इतर कार्यकर्ता व शेतकरी वर्ग उपस्थित होते.

Related posts