गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची बैठक संपन्न, जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्र निहाय पक्षाच्या स्थितीचा घेतला आढावा..

211 Views
प्रतिनिधि।
गोंदिया: आज गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व आघाडी व सेल चे जिल्हा अध्यक्ष, जिल्हा महासचिव व सर्व तालुका व शहर अध्यक्ष यांची महत्वपूर्ण बैठक राष्ट्रवादी काँग्रेस भवन, रेलटोली गोंदिया येथे माजी आमदार श्री राजेंद्र जैन व जिल्हाध्यक्ष श्री विजय शिवनकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.
या बैठकीला गोंदिया जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्र निहाय पक्षाच्या स्थितीचा आढावा घेण्यात आला. जिल्हा परिषद क्षेत्र निहाय बूथ कमिटीचे सशक्तीकरण व कार्यकर्त्याशी समन्वय साधून आगामी निवडणुकीत जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी पक्ष वाढीवर भर देण्यात यावी या सोबतच विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी सर्वश्री राजेंद्र जैन, विजय शिवणकर, गंगाधर परशुरामकर, राजलक्ष्मी तुरकर, विशाल शेंडे, जितेश टेभरे, रफिक खान, किशोर तरोणे, मनोज डोंगरे, प्रेमकुमार रहांगडाले, सी. के. बिसेन, लोकपाल गहाणे, कमलबापू बहेकार, अविनाश काशीवार, गोपाल तिराले, सोमेश रहांगडाले, बाळकृष्ण् पटले, अशोक सहारे, महेंद्र सहारे, बाबाभाऊ बोपचे,  मुकेश खरोले, दिनेश कोरे, राजेश तुरकर, किरण बन्सोड, राजू ठाकरे, अहमद सबिल कुरेशी, सय्यद ईकबाल, सुरेंद्र रहांगडाले, भास्कर कोठेवार, नागो बन्सोड, समीर खान, साकीर खान, सतीश पारधी, कपिल बावनथडे, कुणाल बावनथडे, मोनू मेश्राम, रवी तिडके, शालिकराम नाकाडे, कान्हा बघेले, चंद्रसेन उके, महेंद्र गेडाम, एकनाथ वहिले, सुनील पटले, शैलेश वासनिक, सहित पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.

Related posts