गोंदिया: कोरोना काळात सेवा देणारे कंत्राटी कर्मचा-यांनी सेवा बहाल करण्याची जिल्हाधिका-याना केली मागणी

167 Views

कोरोना काळात ज्यानी जीव ओतून सेवा दिली अशा कर्मचा-याना पुरस्कृत केले पाहिजे त्याना पदमुक्त करने अन्यायकारक- अतुल सतदेवे ( संयोजक संविधान मैत्री संघ व आता लढुया एकीनेच)

तिस-या लाटेच्या संभावित पार्श्वभुमीवर कर्मचा-यांची गरज असताना आम्हाला सेवेतून काढुन शासन जनतेच्या जिवाशी खेळत आहे- भाग्यश्री क्षीरसागर (कंत्राटी कर्मचारी)

गोंदिया (9 ऑगस्ट):- “कोविड-19 हा महाभयंकर आजार आहे. या आजाराची लागण झालेले रुग्ण देशात आढळल्यानंतर सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले. आजारी रुग्णांजवळ कोणतीही व्यक्ती जाऊ शकत नव्हती. अशा काळात आम्ही कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आपल्या जिवाची पर्वा न करता रुग्णसेवा केली. दरम्यान मार्च 2021 मध्ये कोरोनाची दुसरी महाभयंकर लाट आली. एप्रिल महिन्यात तर या लाटेने उच्चांक गाठला. त्यातही आम्ही कर्मचाऱ्यांनी रुग्णसेवा करून कोविड-19 सारख्या जीवघेण्या आजाराला परतून लावले. गोंदिया जिल्ह्यात वैद्यकीय अधिकारी प्रयोगशाळा तंत्रज्ञ, डेटा एंट्री ऑपरेटर, स्टाफ नर्स, औषध निर्माता, ईसीजी टेक्निशियन, एक्स-रे टेक्निशियन असे विविध संवर्गातील 153 कर्मचारी कोविड -19 च्या महामारीत दिवस रात्र कार्यरत होते. आमची नियुक्ती करताना आम्हाला प्रथमता तीन महिन्याच्या कंत्राटी तत्वावर सेवेत घेण्यात आले. त्यानंतर पूर्ण नियुक्ती देण्यात आली. दरम्यान कोरोनाची दुसरी लाट आता संपुष्टात येत असून तिसरी लाट येण्याची चिन्हे असल्याने शासकीय स्तरावरून उपाययोजनांवर भर देण्यात येत आहे. तथापि असे असताना अचानक 2 ऑगस्ट 2019 रोजी कोविड-19 काळात कार्य करणाऱ्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना करार कालावधीही संपुष्टात येण्यापूर्वीच, कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक पदावरून काढण्यात आले. कोविड-19 सारख्या महाभयंकर आजाराच्या रुग्णांवर, जीवाची परवा न करता उपचार करण्याचे कार्य कंत्राटी कर्मचाऱ्यांनी केले. केवळ कोविड-19 च्या रुग्णांवर नव्हे तर कोविड-19 पॉझिटिव महिलांची प्रसुतीचे कार्य शुद्धा आम्ही कर्मचाऱ्यांनी केलेले आहे.

संकटाच्या काळात सेवा दिल्यानंतर शासनाकडून अशाप्रकारे आमची फसवणूक केली जाईल असे कधीच वाटले नव्हते. कोविड-19 च्या प्रकोप संपला नसताना सेवेतून कार्यमुक्त करणे म्हणजे कोविड-19 चे आजार संपल्याचे अघोषित पणे जाहीर करण्यासारखे आहे. कोविड-19 च्या रुग्णांचे प्रमाण कमी झाले. मात्र पाझीटीव्ह रुग्ण निघतच आहेत. शिवाय तिसरी लाट येण्याची शक्यता सुद्धा वर्तविली जात आहे. त्यातच लसीकरणाची मोहीम सुद्धा राबविण्यात येत आहे. त्यासाठी या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांची गरज भासणारच आहे. त्यामुळे कोविड-19 च्या आजारा चे समूळ उच्चाटन होत नाही तोपर्यंत कोणत्याही अधिकारी कर्मचाऱ्यांना सेवेतून कमी करू नये. रुग्णसेवा ही गरज ओळखून सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना इतरत्र सामावून घ्यावे.” अशी मागणी गोंदिया जिल्ह्यातील कोविड-19 अंतर्गत सेवा देणारे कंत्राटी अधिकारी/ कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी नयना गुंडे याना केली व मागणीचे निवेदन ही जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले.

यावेळी संविधान मैत्री संघ व आता लढुया एकीनेच टीम चे अतुल सतदेवे, वैद्यकिय अधिकारी/कर्मचारी भाग्यश्री क्षिरसागर, रुपाली गेडाम, के.एन. मेश्राम, दुर्गा ठाकरे, निधी मिश्रा, मेघा वासनिक, सिमरन मेश्राम, प्रतिभा बघेले, मोनाली तुमसरे, चंद्रकिरण भेलावे, डॉ. प्रिती फाये सविता गायधने, ओमेश्वरी हरिणखेडे, वैशाली दोनोडे, दिक्षा कुर्वे, नेहा राणे, शिवानी खोब्रागडे, रजनी महारवाडे, मनीषा कोठेवार, स्वीटी बोरकर, एल.जी. नेवारे, कविता टेंभुर्णीकर, अंकित वासनिक, त्रिवेणी चौधरी, डॉ. विजय चव्हाण, डॉ. श्रुती पटले, डॉ. करिष्मा लंजे, डॉ. अंकिता राहुलकर, डॉ. पल्लवी बिसेन, डॉ.केशिनी मंडीये, नेहा टेंभुर्णीकर, मनीषा बोहरे, खोमेश्वरी बिसेन, वर्षा नंदगवली, ज्योती, वर्षा मदनकर, पौर्णीमा देशमुख, कविता टेंभुर्णीकर, प्रीती रहमतकर, दिलीप मेंढे, ललिता गायधने, कल्याणी भैसारे, मोहिनी भाजीपाले, दिक्षा कुर्वे, जितेंद्र मेंढे, मोनिका उके,पायल हरिणखेडे, विजया पटले, शितल कांबळे, पुजा बोलने, अनमोल सावरकर, आरजू मेश्राम, सरिता समरित आदि उपस्थीत होते.

मागणी मान्य करण्यात आली नाही तर “आता लढुया एकीनेच” या सामाजिक संघटने मार्फत मोठा आंदोलन केला जाणार असल्याची माहिती देण्यात आली.

Related posts