वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या ‘त्या’ मृताच्या कुटुंबाला वन विभागाकडून 1 लाखाची मदत, माजी जिप सभापती डोंगरे यांचे प्रयत्न

299 Views

 

प्रतिनिधि।
गोंदिया, 22 जुलै। गोरेगाव तालुक्यातील पिंडकेपार जंगल शिवारात बुधवारी 21 जुलै रोजी भडंगा येथील पुना मोहन मेश्राम याचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. तेव्हा मृताच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्याची मागणी माजी जि.प. सभापती विश्वजीत डोंगरे यांनी संबंधित वन विभागाकडे करून तसा पाठपुरावा केला. दरम्यान, त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून वन विभागातर्फे गुरुवारी 22 जुलै रोजी मृताच्या पत्नीला 1 लाख रुपयाची आर्थिक मदत देण्यात आली.

पुना मेश्राम यांच्या मागे त्यांची पत्नी या एकट्याच राहिल्या असून घरातील कमावता व्यक्ती गेल्याने त्यांच्यावर मोठे संकट कोसळले होते. तेव्हा त्यांना वन विभागाकडून आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी घोटी जिल्हा परिषद क्षेत्राचे माजी सभापती विश्वजीत डोंगरे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडे करून तसा पाठपुरावाही केला. तेव्हा त्यांच्या प्रयत्नाना यश आले असून गुरुवारी वन विभागाच्या वतीने मृताच्या पत्नीला 1 लाख रुपयाची आर्थिक मदत देण्यात आली. दरम्यान, विश्वजीत डोंगरे यांच्या हस्ते मृताच्या पत्नी गोमनबाई मेश्राम यांना 1 लाख रुपयाचे धनादेश देण्यात आले.

यावेळी गोरेगाव वनक्षेत्राधिकारी प्रविण साठवणे, विक्की लांजेवार, सरपंच शारदा उके उपसरपंच उमाकांत मोटघरे , ग्रा. पं. सदस्य खुटमोडे, नरेन्द्र पटले, हेमंत मस्करे , संपता मंडिये आदी उपस्थित होते.

Related posts