भंडारा-तुमसर-बपेरा व देव्हाडी-साकोली मार्गाची दर्जोउन्नती

698 Views

 

केंद्रीय मंत्रालयाचा हिरवा दिवा, खा. प्रफुल पटेल व आ. कारेमोरे यांच्या पाठपुराव्याला यश

प्रतिनिधि। 22 जुलै

गोंदिया/भंडारा : गोंदिया व भंडारा या दोन्ही जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी खा. प्रफुल पटेल प्रयत्नरत आहेत. त्यानुरूप दोन्ही जिल्ह्यातील विकास कामांना गती देणे आणि प्रस्तावित कामांना मंजुरी प्राप्त करून घेण्यासाठी पाठपुरावा करण्याचे काम सातत्याने करत आहेत. परिणामी पाठपुराव्याला यश प्राप्त होत आहे. याच शृंखलेत दोन्ही जिल्ह्याच्या विकासात भर पडली आहे. केंद्राच्या सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाने भंडारा-तुमसर-बपेरा या महाराष्ट्र व मध्यप्रदेश मार्गाला राष्ट्रीय महामार्ग व देव्हाडी ते साकोली या मार्गाची दर्जोउन्नतीसाठी मसुदा अधिसुचना काढली आहे. यामुळे यादोन्ही मार्गाच्या दर्जोन्नतीने दोन्ही जिल्ह्याच्या विकासाला नवा आयाम मिळणार आहे. खा. प्रफुल पटेल व आ. राजु कारेमोरे यांच्या पाठपुराव्याचे हे फलित मानले जात आहे.
गोंदिया व भंडारा या दोन्ही जिल्ह्याच्या सिमेला लागून मध्यप्रदेश राज्य आहे. यामुळे मध्यप्रदेश राज्यातील सिमेलगतचे जिल्हे व गोंदिया-भंडारा या दोन्ही जिल्ह्याचे दळण वळण मोठ्या प्रमाणात होत असते. मध्यप्रदेश व महाराष्ट्र या दोन्ही राज्याला वैनगंगा या नदीने दुभागले आहे. नदीवर पुलाचे बांधकाम करण्यात आले. एवढेच नव्हे तर दोन्ही जिल्ह्याचे संबंध मध्यप्रदेश राज्यातील रस्त्यांच्या माध्यमातून आणखी घट व्हावे यासाठी खा. प्रफुल पटेल सातत्याने प्रयत्नरत आहे. नदीवरिल पुलाचे बांधकाम असो कि पाणी अडविण्याचे प्रश्न असो या सर्व समस्या दोन्ही राज्यातील सरकारात समन्वय साधून सोडविण्याचे काम खा. प्रफुल पटेल यांनी प्राधान्यानी केले.त्यातच भंडारा-तुमसर-बपेरा या मार्गाची दर्जोन्नती व्हावी व देव्हाडी-साकोली या मार्गाच्या दर्जोन्नतीसाठी आ.राजु कारेमोरे यांच्यासह खा. प्रफुल पटेल यांनी केंद्रीय सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन पाठपुरावा केला.

ना.गडकरी यांनी दिलेल्या आश्वासनानुरूप केंद्रीय मंत्रालयाने भंडारा- तुमसर – बपेरा या रस्त्याला राष्ट्रीय महामार्ग व साकोली-देव्हाडी या मार्गाची दर्जोन्नती करण्या संदर्भात अधिसुचना निगर्मित केली आहे. यामुळे गोंदिया-भंडारा हे दोन्ही व मध्यप्रदेश राज्याला जोडणारा मार्गाने दळण वळण आणखी सोयीचे होणार आहे. त्याच प्रमाणे साकोली-देव्हाडी या मार्गाच्या दर्जोन्नतीमुळे ही मोहाडी, तुमसर, तिरोडा हे तालुके राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ ला जोडले जाणार आहे. दोन्ही मार्गाच्या दर्जोन्नतीला मिळालेला हिरवा दिवा खा. प्रफुल पटेल व आ. राजु कारेमोरे यांच्या पाठपुराव्याचे फलित मानले जात आहे.

Related posts