आमच्याकडे खा. प्रफुल पटेल सारखे सक्षम नेतृत्व, पक्षाच्या कामाचा प्रचार व प्रसार जोमाने करा – माजी आमदार राजेंद्र जैन

226 Views

चार जिला परिषद क्षेत्राची पक्ष बैठक संपन्न..

प्रतिनिधि। 20 जुलै
गोंदिया: आज गोंदिया तालुक्यातील कुडवा, फुलचूर, पिंडकेपार व रतनारा या चार जिल्हा परिषद क्षेत्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक माजी आमदार राजेंद्र जैन, जिल्हाध्यक्ष विजय शिवणकर व डॉ. खुशाल बोपचे यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस भवन, गोंदिया येथे पार पडली.

या बैठकीत माजी आमदार राजेंद्र जैन, जिल्हाध्यक्ष विजय शिवणकर व डॉ. खुशालजी बोपचे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी माजी आमदार राजेंद्र जैन आपले संबोधनात म्हणाले की, जिल्ह्याला खासदार प्रफुल पटेल यांच्यासारखे सक्षम नेतृत्व मिळाले आहे. श्री पटेल यांच्या प्रयत्नाने शेतकर्यांना ७०० रुपये बोनस व रब्बी हंगामातील धानखरेदीची मुदतवाढ यासारखे अनेक कामे पार पडली. धापेवाडा सिंचन प्रकल्प खासदार प्रफुल पटेल यांचा प्रयत्नाने झालेला आहे.

जिल्हाध्यक्ष श्री विजय शिवणकर म्हणाले की, जिल्हा परिषद व पंचायत समिती पर्यवेक्षक व बुथ प्रमुखांनी प्रत्येक गावांत बैठका लावून बुथ समिती सक्षम करण्याचे काम करावे व प्रत्येक घरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पोहचविण्याचा प्रयत्न करावा. कार्यकर्त्यांनी आपसांत समन्वय स्थापन करुन अंतर्गत गटागटाचे राजकारण बंद करुन पक्षाला मजबूत करण्याचे काम करावे.

यावेळी डा. खुशालजी बोपचे म्हणाले की, पक्षाच्या कामाचा प्रचार व प्रसार करण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे. विरोधकांच्या अपयशाचा प्रचार प्रसार घरोघरी जाऊन करावा. जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये पक्षाची सत्ता असेल तर विकास कामे करणे सोयीचे होते.

या वेळी बैठकीत सर्वश्री बाळकृष्ण पटले, कुंदन कटारे, जितेश टेभरें, अखिलेश सेठ, गणेश बरडे, सुनील पटले, नितेश टेंभरे , करण टेकाम, तीर्थराज हरिणखेडे, शिवलाल नेवारे, श्रीधर चन्ने, शैलेश वासनिक , रमेश गौतम, मदन चिखलोंडे, महेंद्र बीजेवार, रामेश्वर चौरागडे, झनक लाल ढेकवार, सौरभ रोकडे, किरण बंसोड, नरहरप्रसाद मस्करे, कपिल बावनथडे, कुणाल बावनथडे, हेमराज डहाके, हंसराज हट्टेवार, राजेश रहांगडाले, पंचम चौधरी, योगेश डोये, वीरेंद्र मुरकुटे, राजेश सोनवणे, योगेश डोये, शेखर माडिये, प्रवीण बीजेवार, राहुल नेवारे, दिलीप डोंगरे, गणेश मानवतकर, बबलू कटरे, अतुल भगत, अंकलेश कुटीर, हितेश बिसेन, योगेश बिरनवार, राजेश तुरकर, कोमेंद्र , भुमेश मेश्राम, प्रदीप लांजेवार, चुउणिलाल सूर्यवंशी, योगेश पतेह, अजय पतेह, कशिश बागडे, ईश्वर लोणारकर, खोमेन्द्र कटरे, आई. बी. मोहरे, सौ. आशा पटले, दुर्योधन भोयर, सौ. उषा मेश्राम व आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Related posts