गोंदिया: दहा वर्षापासून नोकरीच्या प्रतीक्षेला दिलासा, 5 अनुकंपा पदे भरली

603 Views

 

तलाठी, महसूल सहायक, शिपाई अनुकंपा पदभरती,जिल्हाधिकारी राजेश खवले यांच्या हस्ते सर्व निवड झालेल्या उमेदवारांचे अभिनंदन 

गोंदिया,दि.18 : अनुकंपा पदभरती-2020 तलाठी, महसूल सहायक व शिपाई या संवर्गात करण्यासाठी 14 जून 2021 रोजी जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली जिल्हा निवड समितीची सभा घेण्यात आली.

या सभेत तलाठी संवर्गातील 2 पदे, महसूल सहायक संवर्गातील 1 पद व शिपाई संवर्गात 2 असे एकूण 5 पदाकरीता उमेदवारांची निवड करण्यात आली. नियुक्त झालेल्या उमेदवारांना जिल्हाधिकारी राजेश खवले यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व आदेश देऊन सर्व निवड झालेल्या उमेदवारांचे अभिनंदन करण्यात आले.

Related posts