जिल्ह्यातील 14 महसूल सहाय्यक यांना पदोन्नती, गोंदिया जिल्हा महसूल कर्मचारी संघटने ने मानले जिल्हाधिकारी यांचे आभार.

351 Views

 

गोंदिया: दि. 18
जिल्ह्यात महसूल विभागात वर्ष -2018 पासून प्रलंबित असलेले विविध प्रश्न निकाली काढण्याबाबत वारंवार निवेदन देऊन सुद्धा महसूल कर्मचाऱ्यांचे प्रश्न निकाली निघत नव्हते. परंतु जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी जिल्हाधिकारी, गोंदिया या पदाचा कार्यभार हाती घेताच संबंधित अधिकारी कर्मचारी यांना महसूल विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे प्रलंबित असलेले प्रश्न तात्काळ निकाली काढण्याचे निर्देश दिले.

महसूल सहाय्यक संवर्गातून अव्वल कारकून या संवर्गात पदोन्नती देताना शासन नियमानुसार विविध टप्पे पार करून जेष्ठता यादी प्रसिद्ध करून त्यावर सात दिवसाच्या आत आक्षेप मागविण्यात आले व दुसऱ्याच दिवशी जिल्हा निवड समितीची बैठक आयोजन करून दिनांक 15. 06. 2021 रोजी सर्व महसूल सहाय्यक यांना पदोन्नतीचे आदेश देण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालय, गोंदिया तसेच उपविभागीय अधिकारी, कार्यालयात कार्यरत असलेले एकूण 14 महसूल सहाय्यक यांना अव्वल कारकून या संवर्गात विक्रमी वेळेच्या आत पदोन्नती देऊन कर्मचाऱ्यांच्या सोयीनुसार पदस्थापना देखील देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी वरील कार्यवाही केवळ दहा दिवसातच पूर्ण केल्यामुळे महसूल विभागातील कर्मचाऱ्यांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून महसूल विभागात जिल्हाधिकारी यांचे कौतुक करण्यात येत आहे.

Related posts