कोरोनामुक्ती साठी संतुलित आहार घ्या-डॉ सुवर्णा हुबेकर

362 Views

 

प्रतिनिधि।

गोंदिया। आधार महिला संघटन आणि केटीएस जिला सामान्य रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘माझा जिल्हा माझी जबाबदारी कार्यक्रमात सोमवारी डॉ सुवर्णा हुबेकर आणि डॉ. नेहा वंजारी यांनी मार्गदर्शन केले.या वेळी आधार संघटनेच्या अध्यक्षा माजी सभापती भावनाताई कदम उपस्तिथ होत्या.

कॉरोना बाबत जनजागरण अभियानात पोशाहार बाबत माहिती देताना केटीएस च्या वरिस्ट वैदयकीय अधिकारी डॉ सुवर्णा हुबेकर यांनी सांगितले की कोरोनाविरुद्ध लढताना रोगप्रतिकारशक्ती गरजेची आहे. यासाठी व्‍हिटॅमीन सी, डी आणि झिंक औषधे दिली जातात. मात्र ही औषधे आपण जास्त वेळ खाऊ शकत नाही. रोगप्रतिकारशक्ती उत्तम ठेवण्यासाठी लिंबु, आवळा, मोसंबी, द्राक्षे अशी लिंबुवर्गीय फळे घ्या. याशिवाय नियमित व्यायाम करा, असा सल्ला त्यांनी दिला.

डॉ सुवर्णा हुबेकर यांनी सांगितले की सर्वेक्षणातून असे आढळून आले आहे की बरेच लोक स्वतः हुन सेल्फ मेडिकेशन व रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी महागडी औषधे खाजगी मेडिकल्स मधून विकत घेत आहेत याची काहीही गरज नाही असे सल्ला डॉ सुवर्ण हुबेकर यांनी दिला।
आज कोव्हिडनुसार जीवनशैली विकसित करणे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे सर्वप्रथम प्रतिकारशक्ती वाढविण्याकडे लक्ष द्यावे लागेल. त्याकरिता व्हिटॅमीन सी आणि डीकरिता लिंबुवर्गीय फळे खा, झिंककरिता सुकामेवा घ्या. लवकर झोपणे आणि लवकर उठण्यावर भर देण्याची सूचनाही त्यांनी केली. नैसर्गिक बाबींचा जीवनशैलीत अंगीकार करा. मास्क, नियमित हात धुणे, सॅनिटायजरचा वापर जीवनावश्यक आहे.
कॉरोना बाबत व्हाट्सअप्प व समाजमधमातून समोर केलेली माहीती वाचून लोक पॅनिक होऊन स्वतः टॉनिकस वैगेरेचे सेवन करत आहेत हे चुकीचे आहे . नैसर्गिक रोगप्रतिकारशक्ती वाढविनासाठी स्थानिक स्तरावर जे लोकल लिंबू वर्गीय मोसमी फळे उपलब्ध आहेत ते जर आपण नियमित सेवन केले तर कॉरोना या वायरल आजारावर आपण चांगली मात देऊ शकतो
वैयक्तिक स्वच्छता पालन करणे व वारंवार हॅट धुणे नेहमी मास्क घालणे हेच सध्या कॉरोनवर प्रतिबनधक उपाय आहे असे आवाहन डॉ सुवर्णा हुबेकर यांनी माझा जिल्हा माझी जिम्मीदारी या जनजागरण अभियानातून आज कुडवा येथे दिली या वेळी डॉ वंजारी पीएचन निळू चुटे नेहा गडलिंगकर आदी उपस्तीत होते।

Related posts