आज लाखनी (भंडारा) येथे शिव भोजन केंद्राचे माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या हस्ते उद्घाटन

162 Views

 

भंडारा:03जून – गोदिया जिल्ह्यातील गरीब व गरजु लोकांना पोटभर जेवन मिळण्यासाठी खासदार श्री प्रफुल पटेल जी दोन्ही जिल्ह्यामध्ये शिवभोजन केंद्र शुरु करण्यासाठी प्रयत्नरत होते. कोरोणा संक्रमणाच्या काळात संचारबंदीमुळे लोकांच्या हाताला काम नाही, अश्यावेळी गरीब व गरजवंत लोकांना भरपेट जेवन मिळाले पाहिजेत यासाठी खासदार श्री पटेल जी च्या प्रयत्नाने भंडारा – गोंदिया जिल्हयात शिव भोजन केंद्र मंजूर झाले आहेत.

आज लाखनी (भंडारा) श्री लोकेश रणदिवे काँम्प्लेक्स, शिवाजी चौक, लाखनी येथे शिव भोजन केंद्राचे उद्घाटन माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांच्या शुभहस्ते संपन्न झाला महाविकास आघाडी सरकारच्या या महत्त्वाकांक्षी गरीब व जरुरतमंद लोकांच्या हितोपयोगी योजनेच्या माध्यमातून गरीब लोकांना भोजन मिळणार आहे.

कोरोना संक्रमणाच्या काळात निःशुल्क भोजन गरीब लोकांना लाभकारी ठरत आहे. या शिव भोजन केंद्राअतर्गत प्रत्येक दिवशी 100 थाली भोजन गरजवंताना निःशुल्क मिळणार आहे.राज्याच्या महाविकास आघाडी सरकार च्या या जनहितेषी शिव भोजन योजनेचा ग्रामीण क्षेत्रातील गरीब व गरजवंत लोकांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री जैन यांनी केले.

यावेळी सर्वश्री नानाभाऊ पंचबुद्धे, धनंजयजी दलाल, दामाजी खंडाईत, डॉ. विकास गभने, धनु व्यास, नागेश पाटील वाघाये, राजेश निंबेकर, अनिल निर्वाण, जितेंद्र बोन्द्रे, असिफ खान पठाण, सचिन उके, रोहित साखरे, सुनीता खेडीकर, आशिष बावणे, सुनील बर्वे, रामेश्वर गिर्हेपूजे, अनमोल फुलसुंगे, विजय चाचेरे समस्त पदाधिकारी व ग्रामवासी उपस्थित होते.

Related posts