खा. प्रफुल्ल पटेलांच्या प्रयत्नाने नागरी क्षेत्राच्या विकासासाठी 15 कोटीचा निधी..

892 Views

गोंदिया :- खासदार प्रफुल पटेल यांच्या पुढाकाराने गोंदिया भंडारा जिल्ह्यातील 11 नागरि क्षेत्रातील सुचविलेल्या विकास कामांसाठी 15 कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. नियोजन विभागाने निर्गमित केलेल्या शासन निर्णयात समाविष्ट असलेल्या विकास कामांना प्रशासकीय मान्यता देऊन सुरू करण्यात यावी अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत .यामध्ये गोंदिया जिल्ह्यातील गोंदिया, गोरेगाव, देवरी, सालेकसा ,आमगाव ,तिरोडा, अर्जुनी ,सडक /अर्जुनी व भंडारा जिल्ह्यातील भंडारा, तुमसर, पवनी, लाखनी , लाखांदूर ,साकोली या नागरिक क्षेत्रांचा समावेश आहे.
गोंदिया भंडारा या दोन्ही जिल्ह्यांच्या शाश्वत विकासासाठी खासदार प्रफुल पटेल कटिबद्ध आहेत जिल्ह्यातील जनतेने किंबहुना कार्यकर्त्यांनी कुठे गेलेल्या समस्या मार्गस्थ करण्यासाठी ते कधीही मागे पडत नाही त्याची अनुभूती गतिमान विकास कामावरून येऊ लागली आहे.
गोंदिया भंडारा जिल्ह्यातील नागरी क्षेत्राच्या विकासा कामांसाठी निधी गरज आहे,या बाबत माजी आमदार राजेंद्र जैन यांनी खासदार प्रफुल पटेल यांना माहिती दिली. दरम्यान खा. प्रफुल्ल यांच्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासनाकडून राज्य शासनाकडे अनेक विकास कामे प्रस्तावित करण्यात आली .राज्य शासनाच्या नियोजन विभागाने नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिसूचित विशिष्ट नागरी सेवा व सुविधा पुरविण्यासाठी निधी उपलब्ध करून त्याच्या निर्णय घेऊन मंजुरी प्रदान केली आहे. गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील एकूण ११ नागरि संस्थातील कामासाठी १५ कोटींच्या निधी मंजूर करण्यात आला आहे . मंजूर निधीतून गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील नागरी क्षेत्रांच्या विकासाला आणखी गती मिळणार आहे. यामुळे गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील नागरिकांनी खासदार प्रफुल पटेल यांचे आभार मानले आहे.
नागरी क्षेत्र निहाय कामे व निधी
खा. प्रफुल पटेल यांनी सुचविलेल्या गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील नागरी क्षेत्रातील कामांना मंजुरी प्रदान करण्यात आली आहे.
लाखनी – १० कामे – १.१० कोटी
पवनी* – १२ कामे – १.६० कोटी
साकोली – ७ कामे – ०.७० कोटी
तुमसर – १५ कामे -१.३५कोटी

लाखांदूर -६कामे -०.६०कोटी
भंडारा – १२ कामे -२.१५कोटी

अर्जुनी- ३ कामे -०.३० कोटी
तिरोडा – १४ कामे -१.५०कोटी
देवरी – ५ कामे ०.६० कोटी
सालेकसा – ६ कामे -०.६०कोटी

*गोरेगाव* – ८ कामे-०.८० कोटी
*आमगाव* – ८कामे -०.८० कोटी
*सडक अर्जुनी* – ४ कामे ०.४० कोटी

*गोंदिया* -२७ कामे २.५० कोटी

Related posts