518 Views
वार्ताहर/ 16 आक्टो.
गोंदिया। गोंदिया तालुका कुडवा जिल्हा परीषद अंतर्गत मयूर लॉन कटगीकला येथे राष्ट्रवादी काँग्रेस बूथ कमिटीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांच्या प्रमूख उपस्थितीत संपन्न झाली. जिल्हा परीषद क्षेत्रातील प्रत्येक बुथवर बूथ कमेटीचे गठण करणे, सक्रिय कार्यकर्त्यांचा व महिला, युवक यांचा कमिटीत सहभाग असावा तसेच क्षेत्रातील विविध विषयांवर माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांच्याशी चर्चा करण्यात आली.
महायुती सरकारने महिलांच्या आर्थिक, सामाजिक सक्षमीकरणासाठी लाडकी बहीन योजना मागील 4 महीन्यापुर्वी अंमलात आणली. दरम्यान योजनेच्या माध्यमातून महिलांच्या खात्यात दरमहा 1500 प्रमाणे व भाऊबीजचें ऍडव्हान्स साडेसात हजार रुपये खात्यात जमा झाले आहेत, महिलांना एस.टी. बस मध्ये 50 टक्के सवलत तसेच मुलींना उच्च व्यावसायिक शिक्षण निःशुल्क, बचत गटाच्या महिलांना छोटे उद्योग करण्यासाठी कमी दरात भाग भांडवल अश्या अनेक महिलांच्या सक्षमीकरणासाठी जन हितकारी योजना सरकारने राबविल्या आहेत. खा. श्री प्रफुल पटेल यांच्या प्रयत्नाने शेतकऱ्यांना बोनस, विज बिल माफ, तसेच युवक, कामगार यांच्या उत्थानासाठी व प्रगती साठी काम केले आहे असे प्रतिपादन माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांनी केले.
यावेळी सर्वश्री राजेंद्र जैन, पुजा अखिलेश सेठ, बालकृष्ण पटले, कुंदनभाऊ कटारे, केतन तुरकर, निरज उपवंशी, अखिलेश सेठ, महेश लांजेवार, निरज उपवंशी, रवि पटले, रमेश गौतम, किर्ती पटले, सदाशिव वाघाडे, शैलेष वासनिक, सुनिल पटले, पूजा डहाटे, शिवलाल नेवारे, योगराज नागपुरे, पायल बागडे, सुंदरी तांडेकर, गीता चौधरी, अल्का शेंडे, रविकला नागपूरे, कमला श्रीभाद्रे, मंजित सहारे, विमलाताई उईके, शिशृपाल उपरीकर, अर्चना चौधरी, गौतमा रिषी, मुमताज पठान, दिपक डोगरवार, संदिप बानेवार, किर्ती भेलावे, विनोद मेश्राम, जीवन दमाहे, गोंविद वासनिक, बंटी गौतम, भन्नु मरस्कोल्हे, संतोष फुडे, इशु वाघाडे, ललीता बंसोडे, निर्मला अगड़े, देवीश्री नागरीकर, ललीता बटाने, संतोषी बागडकर, शारदा बालेवार, गुनेश्वरी पटले, इंदिरा नागपुरे, स्वाती रहांगडाले, संघमित्रा वैद्वय, रौनक ठाकुर सहित जिल्हा परीषद क्षेत्रातील बूथ कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते.