माजी आमदार राजेन्द्र जैन यांचे हस्ते गोंदिया तालुक्यातील रावनवाड़ी, चिरामनटोला, पांजरा येथे रब्बी धान खरेदी केंद्राचे उद्घाटन..

221 Views

शेतकऱ्यांना मोठी दिलासा, प्रफुल्ल पटेल यांच्या पाठपुराव्यानंतर धान खरेदीला वेग..

प्रतिनिधि। 23 मई
गोंदिया। मागील दोन दिवसांपासून रब्बीच्या शासकीय धान खरेदीला सुरुवात झाली आहे. धान खरेदी केंद्राच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. आतापर्यंत जवळपास बहुतेक ठिकाणी धान खरेदी केंद्र सुरु झाल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठी दिलासा मिळाली आहे.
  आज रविवारी (दि.२३) गोंदिया तालुक्यातील रावणवाडी येथील साईनाथ शेतकरी बहुउद्देशीय कृषी उत्पादन उपज विपणन व प्रक्रिया सहकारी संस्था मर्या. चिरामनटोला या सेंस्थेचे धान खरेदी केंद्राचे उद्घाटन माजी आ. श्री राजेंद्र जैन यांच्या हस्ते करण्यात आले. यामुळे परिसरातील शेकडो शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
   धान खरेदीच्या केंद्राच्या उद्घाटना प्रसंगी श्री कुंदन कटारे माजी जिला परिषद सदस्य, सरपंच रावनवाडी श्रीमती शीलाताई वासनिक, श्री पन्नालाल हरिणखेडे उपसरपंच रावनवाडी, श्री यशवंत गेडाम, सरपंच मुरपार, श्री गणेश बरडे, श्री विजय रहांगडाले, श्री पृथ्वीराज रहांगडाले, श्री लखन हरिणखेडे, श्री दिनेश हरिणखेडे, श्री ओमकार नागपुरे, श्री राजकुमार रणगिरे, श्री रंजित वासनिक, श्री प्रदीप बावनकर, श्री धर्मेन्द्र लिल्हारे, श्री महेन्द्र कटारे, श्री पारस बसेने, डाॅ.रुपलाल चिखलोंढे, श्री दमाहे गुरुजी, श्री गंगाराम कापसे,पांजरा उपस्थित होते.
   या केंद्रावर रावणवाडी, मुरपार, चारगाव येथील शेतकऱ्यांना धानाची विक्री करता येणार आहे. धान खरेदी केंद्र सुरु झाल्याने शेतकऱ्यांना आता कमी दराने खासगी व्यापाऱ्यांना धानाची विक्री करावी लागणार नाही. तर हमीभावाने धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करता येणार आहे.
   खा. प्रफुल्ल पटेल यांनी रब्बी हंगामातील धान खरेदी केंद्र त्वरित सुरु करुन शेतकऱ्यांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी शासन स्तरावर यशस्वी पाठपुरावा केला. त्यामुळे आता जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने शासकीय धान खरेदीला सुरुवात केली आहे. जवळपास बहुतेक भागात धान खरेदी खरेदी केंद्र सुरु होत असल्याने शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांना कमी दराने धान विक्री करण्याची पाळी आली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी खा. प्रफुल्ल पटेल यांचे आभार मानले. जिल्ह्यातील सर्वच भागातील शासकीय धान खरेदी केंद्र सुरु व्हावेत यासाठी माजी आ. श्री राजेंद्र जैन हे सातत्याने पाठपुरावा करीत आहेत.

 पांजरा धान खरेदी केंद्रावरुन रब्बी हंगामातील धान खरेदीची सुरुवात…

गोंदिया तालुकातील त्रिषाल शेतकरी बहुउद्देशीय संस्था सहकारी संस्था मर्या. पांजरा येथील रबी धान खरेदी केंद्राचे उद्घाटन माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
रब्बी हंगामातील धान खरेदी सुरु करण्यासंदर्भात मंगळवारी खा. प्रफुल्ल पटेल यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ व मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांसह मुंबई येथे चर्चा केली होती.  या बैठकीत या दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांनी तीन दिवसात धान खरेदी सुरु करण्याचे आश्वासन खा. श्री प्रफुल्ल पटेल यांना दिले होते.
   त्यानुसार गुरुवारपासून धान खरेदीला प्रारंभ झाल्याने त्याची पुर्तता झाली आहे. जसे -जसे गोदाम उपलब्ध होतील तस-तसे धान खरेदी केंद्राची संख्या वाढविण्यात येणार आहे. दरम्यान रब्बी हंगामातील धान खरेदीला सुरुवात झाल्याने जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
  यावेळी सर्वश्री कुंदन कटारे, माजी जिल्हा परिषद सदस्य, गणेश  बरडे, गंगाराम कापसे, त्रिशाल लिल्हारे, भोजराज माहुले, उमाशंकर गमगये, चंदनलाल माहुले, मंसाराम लिल्हारे व संचालक मंडळ व बहुसंख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते याप्रसंगी उपस्थितांनी खा.श्री  प्रफुल्ल पटेल व माजी आ. राजेंद्र जैन यांचे आभार मानले.

Related posts