एसडीओ गोंदियाला देण्यात आले बी.एल.ओ. च्या थकीत मानधन व अन्य मागण्याचे निवेदन

595 Views
प्रतिनिधि।
गोंदिया। बी. एल. ओ. चे 2 वर्षाचे थकीत मानधन व अन्य मागण्याचे निवेदन एस. डी. ओ. कार्यालय गोंदिया मध्ये  आयोजित बी एल ओ च्या बैठकी दरम्यान अध्यक्ष  प्रविण  कोचे यांच्या नेतृत्वाखाली एसडीओ मेडमला देण्यात आले.
निवडणुक विषयक मतदार यादीत फोटो अपडेट करण्याकरिता दि. ९. ३. २०२१ मंगळवार ला एसडीओ कार्यालय गोंदिया याठिकाणी एसडीओ मॅडमनी बैठक आयोजीत  केली होती.
बी एल ओ निवडणुक विषयक मतदार यादीचे महत्वाचे कार्य जसे- मतदार नविन नाव नोंदणी, नाव दुरुस्ती, दुबार नाव, मतदारांचे फोटो घेणे,  निवडणुकीच्यावेळी बूथवर राहणे,  वेळोवेळी होणाऱ्या विशेष कॅम्प मध्ये उपस्थिती,  बैठकांमध्ये  उपस्थिती, घरोघरी जावून पडताळणी करणे असे अनेक प्रकारचे कार्य बी.एल.ओ. करित असतात.
 सध्या ज्या मतदारांचे फोटो मतदार  यादीमध्ये नाहीत, त्यांची फोटो घेवून मतदार  यादी अपडेट करण्याचे कार्य सुरु आहे. परंतु मागील 2 वर्षापासुन  बी एल ओ चा मानधन थकीत आहे,  हे एसडीओ गोंदिया वंदना सवरंगपते मॅडमच्या लक्षात आणुन देण्यात आले.
मॅडमने चर्चे दरम्यान सांगितले की, मागणी केलेली आहे,  तरी सुध्दा आपल्या आलेला पत्र पुन्हा पाठवून पाठपुरावा  करु. व लवकरच थकीत मानधन देण्याची व्यवस्था  करु. आणि उर्वरित मागण्या कार्यवाही करिता वरिष्ठ अधिकारी व निवडणुक आयोगास पाठविण्याचे आश्वासन दिले.
मागण्यांचे निवेदन देतेवेळी बी एल ओ संघटना गोंदिया चा अध्यक्ष प्रविण कोचे, सौ. बबिता शेंडे,  उमेश बावनकर, पुरनलाल डाहाके, सौ. सुर्यकांता  बिसेन, लोकचंद बिजेवार, झनकसिंह  लिल्हारे, पुस्तकला चौरे, विजय खोब्रागडे, जी. वाय. पटले,  रंजना भांडारकर, हिना कावळे व अन्य बी एल ओ उपस्थित होते.

Related posts