गोंदिया: बिर्सी कैम्प येथे पार पडला भारत बटालियन-2 च्या 73वां वर्धापन दिवस..परेड आणि रोगनिदान शिविरच्या केले आयोजन..

275 Views
प्रतिनिधि।
गोंदिया। भारत राखीव बटालियन २ राज्य राखीव पुलिस बल गट क्रमांक 15 ‌‌‍ बिर्सी कॅम्प गोंदिया येथे दिनांक 6 मार्च रोजी 73 वा वर्धापन दिवस सोहळा प्रमुख अतिथी समादेशक जावेद अन्वर यांचे प्रमुख  उपस्थितीत पार पाडला. सर्व प्रथम वर्धापन दिन निमित्त हर्ष फायर परेड घेण्यात आली. हर्ष परेड चे आयोजन सामाजिक दुरीच्या अनुषंगाने खबरदारी घेऊन घेण्यात आली.
 परेड चे आयोजन करण्यास प्रभारी समादेशक सहाय्यक विनोद कुमार राय यांनी विशेष परिश्रम घेतले. परेडचे संचलन पोलीस उपनिरीक्षक जे. के .राय यांनी केले. परेड मध्ये कंपनी क्रमांक १ चे नेतृत्व पोलीस उप निरीक्षक शेडमाके, कंपनी क्रमांक २ चे नेतृत्व पोलीस उपनिरीक्षक चौधरी यांनी केले. त्याचप्रमाणे निशान टोळीचे नेतृत्व पोलिस उपनिरीक्षक धुडसे यांनी केले. परेड संचालना नंतर विशेष कामगीरी करणारे पोलीस अधिकारी /अमलदार यांना समादेशक यांच्या हस्ते पुरस्कार व प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.
  सदर परेड वेळी पोलीस निरीक्षक के .बी सिंह  पोलीस निरीक्षक एच.आर. सिंह पोलीस निरीक्षक एस.जी. हिरपुरकर व इतर पोलीस अधिकारी /आमदार हजर होते.
  सदर हर्ष कवायत परेडचे सूत्र सुचालन पोलीस कल्याण अधिकारी सुनील चव्हाण यांनी केले. हर्ष परेड नंतर गट रुग्णालयात डॉक्टर कोकूर्डै यांचे नेतृत्वाखाली पोलीस अधिकारी / अमलदार व त्यांचे कुटुंबीय यांचे करिता वैद्यकीय शिबिर घेण्यात आले.
 रेजिंग डे अनुषंगाने समादेशक यांनी संपूर्ण जवान व कूटूंबीयांना संबोधिन केले व सर्वांना राज्य राखीव पोलीस बल वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
   नंतर गटातील पोलीस अधिकारी /अमलदार व त्यांचे कुटुंबांना करीता रोग निदान शिबिर चे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये स्त्री रोगतज्ञ, डॉ.स्मिता वैद्य, जनरल फिजिशियन, डॉक्टर पांडे एम .एम बी .बी. एस .डी .एन .बी . यांनी आमंत्रित करण्यात आले. होते त्यांनी उपस्थिती अधिकारी / जवान व  विशेषतः महिला यांना कोविड 19 बद्दल स्त्री रोग, प्रसूती, कॅन्सर व अन्य रोगा बाबत मार्गदर्शन व माहिती दिली व त्याच प्रमाणे तपासणी सुद्धा केली.

Related posts