गोंदिया: केंद्रसरकारने पारित केलेल्या तीन कृषी विधेयका विरोधात महाविकास आघाडीच्या आंदोलनाला उत्स्फूर्त समर्थन..

333 Views

 

महामहिम राष्ट्रपति व पतप्रधान यांच्या नावे जिल्हाधिकारी यांना देण्यांत आले निवेदन

हकीक़त न्यूज।
गोंदिया। केन्द्र शासनाने कृषी विषयक पारित केलेल्या तीन विधेयका विरुध्द देशात शेतक-्यांचे आंदोलन सुरु आहे. शेतक-्यांनी या कायद्यांना काळे कायदे सम्बोधून ते रद्द करण्याची मागणी केलेली आहे. सदर कायदे पारित करतांना सरकाने शेतक-्यांचे व विविध शेतकरी संघटनांचे मत विचारात घेतले नाही. संसदे मध्ये सुध्दा या कायद्यांबाबत मत भेद असतांना व विपक्षी दलांनी मतदानाची मागणी केली असतांना गोंधळात आवाजी मताने ते पारित करण्यांत आले. सदर चे कायदे देशातील शेतक-यांना नकारत आहेत. मग सरकार हे कायदे त्यांच्यावर कां लादत आहे ? हे अनाकलनिय आहे.

सदरचे कृषी विषयक कायदे रद्द करण्यात यावे यासाठी विशेष करुन पंजाब व हरियाणातील शेतकरी मोठया प्रमाणात गारठणार्या थंडीतही दिल्लीच्या शिमेवर आंदोलन करित आहेत. मात्र त्यांना दिल्लीत प्रवेश करण्यांस मनाई करण्यांत आली आहे. त्यांचेवर अश्रूधूर व पाण्याचा मारा केला जात आहे. त्यांना खालीस्तांनी आंतकवादी संबोधले जात
आहे. त्यांची व्यथा जाणुन घेण्यासाठी सरकार उशीरा तयार झालेली आहे. पंरतू अजुनही समाधान पूर्वक तोडगा काढण्यांत आलेला नाही. सदर विधेयकांबाबत शेतक-यांना भ्रमीत केल्याचा आरोप केंद्र सरकार द्वारे केला जात आहे. पंरतु हे शेतकरी स्वयंस्फूर्त पणे अनेक दिवसापासून आंदोलन करित आहेत. ही बाब सत्य आहे. शेतक-्यांनी आपले आंदोलन आणखी तिव्र करुन 8 डिसेंबर 2020 ला संपूर्ण भारत बंद ची हाक दिलेली आहे. सदर भारत बंद ला अनेक संघटनानी व राजकीय पक्षानी पांठीबा दिलेला आहे.

महाविकास आघाडी सरकारचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी कांग्रेस, शिवसेना पक्षाने सुध्दा या भारत बंद ला पाठीबां दिलेला आहे. करिता शेतक-्यांच्या हितासाठी व हक्कासाठी दि. 8 डिसेंबर 2020 च्या भारत बंद ला महाविकास आघाडीच्या सक्रिय समर्थन आहे. केंद्र सरकारनी तीन ही काळे कायदे शेती व शेतकरी विरोधी असल्याने ते रद्द करावेत अशी केंद्रसरकारकडे आमची मागणी आहे. या शेतकरी आंदोलनात रैली नेहरु चौक, दुर्गा चौक, महात्मा गांधी चौक, व आम्बेडकर चौक येथे समापन करण्यात आले.

यावेळी खासदार प्रफुलभाई पटेल आंदोलनात प्रामुख्याने उपस्थित होते. गोदिया कांग्रेस कमेटीचे जिल्हाध्यक्ष डॉ. नामदेव किरसान, पूर्व विधायक राजेन्द्र जैन, प्रदेश सचिव विनोद जैन प्रदेश सचिव अमर वराडे, शिवसेना जिला प्रमुख मुकेश शिवहरे, शिवसेना जिल्हा समन्वयक शिवसेना पंकज यादव, प्रदेश प्रतिनिधी राकां देवद्रेनाथ चौबे, जिल्हा महासचिव कांग्रेस एङ. योगेश अग्रवाल, कॉँग्रेस युवा नेता अशोक (गप्पु) गुप्ता, शहर काँग्रेस अध्यक्ष जहिर अहमद, तालुका अध्यक्ष काँग्रेस सर्यप्रकाश भगत, जिल्हाध्यक्ष किसान काँग्रेस जितेश राणे, अंल्पसख्याक विभाग परवेज बेग, ओबीसी विभाग जितेद्र कटरे, चमन बिसेन, दिलीप गौतम,जिल्हाध्यक्ष युवक काँग्रेस आलोक मोहंती, अरुण गरजभिये, रामश्वर लिल्हारे, हरिश तुलसकर, जिल्हाध्यक्ष एनएसयुआई, श्यामभाऊ गणविर, नरेश लिल्हारे, नफीस सीदीकी, निलम हलमारे, प्रशांत लिल्हारे, सुनिल खरकाटे, अमर राहुल, अमित भालेराव, कुशन पंधरे, चंद्रकुमार बागडे, बहुसंख्येत काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते या आंदोलनात उपस्थित राहून जिल्हाधिकारी
यांना महामहिम रामनाथ कोविद, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे नावे निवेदन देण्यांत आले.

Related posts