अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज रामायणा सुपर स्पेशलीटी हॉस्पिटल अँड ट्रामा सेंटर चे शुभारंभ..

60 Views

 

गोंदिया। आज बोपचे पेट्रोल पंप, अवंती चौक, रिंग रोड गोंदिया येथे रामायणा सुपर स्पेशलीटी हॉस्पिटल अँड ट्रामा सेंटर चे उदघाट्न माजी आमदार श्री राजेंद्र जैन, आमदार श्री विजय रहांगडाले यांच्या हस्ते दिप प्रज्वलन व फीत कापून करण्यात आले.

रामायणा सुपर स्पेशलीटी हॉस्पिटल अँड ट्रामा सेंटर हे ब्रेन ट्रामाअँड ट्युमर सर्जरी, एंडोस्कोपी स्पिनल अँड ब्रेन सर्जरी, ऍडव्हान्स नयूरो सर्जरी, बर्न युनिट, आर्थो अँड बोन रिप्लेसमेंट, युरोलॉजि, डायलिसिस सुविधा सह आरोग्य क्षेत्रात अत्याधुनिक मशिनरी व यंत्र साहित्याच्या सहाय्याने सर्व सोयी सुविधानी सुसज्ज हॉस्पिटल रुग्णांच्या सेवेसाठी उपलब्ध होत आहेत. रुग्णांना उच्च दर्जाचे आरोग्य सेवा देण्याच्या उद्देशाने आणि अत्याधुनिक सुविधा युक्त रुग्णालय असणार आहे. रुग्णांच्या सेवेसाठी २४ तास उपलब्ध राहणार असल्याची माहिती डॉ. बघेले यांनी दिली.

शुभारंभ प्रसंगी सर्वश्री राजेंद्र जैन, विजय रहांगडाले, केतन तुरकर, डॉ संदीप मेश्राम, सुनील पटले, डॉ ओम बघेले, डॉ निशांत करवाडे, डॉ स्विटी बघेले, डॉ विनय रहांगडाले, डॉ आकांशा करवाडे, डॉ मिताली रहांगडाले, सह डॉक्टर व नागरिक उपस्थित होते.

Related posts