आदिवासी विद्यार्थी संघ स्नेहसंमेलनाचे माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न

25 Views

 

गोंदिया। आदिवासी विद्यार्थी संघ विदर्भ शाखा गोंदिया व आदिवासी मुला – मुलींचे शासकीय वस्तीगृहाच्या वतीने आज ११ जानेवारीला भवभूती रंग मंदिर, पुनाटोली, गोंदिया, येथे जिल्हा वार्षिक दोन दिवसीय स्नेहसंमेलनाचे उद्घाटन माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांच्या उपस्थितीत पार पडले.

जिल्ह्यातील होतकरू व प्रतिभावान आदिवासी विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात राहतांना एकत्र येवून आपल्या विचारांची आदान – प्रदान करता यावी व भविष्यात विविध स्पर्धांना समोर जातांना अनेक अडचणींनाच सामना करावा लागतो अशा होतकरू विद्यार्थ्यांना मागदर्शन लाभावे. सोबतच त्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना प्रदर्शित करता यावे या करिता यासारख्या कार्यक्रमाचे आयोजन महत्वाचे आहे. असे प्रतिपादन माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांनी यावेळी मार्गदर्शन करतांना केले.

कार्यक्रम प्रसंगी सर्वश्री राजेंद्र जैन, करण टेकाम, ए बी मरस्कोल्हे, अजय कोटेवार, मधू दिहारी, प्रमिलाताई सिन्द्रामे, संगीता पुसाम, ललिता ताराम, निखिल बन्सोड, राहुल येल्ले, नीलकंठ चिंचाम, देवविलास भोगारे, मुन्ना कोसमे, दखने सर, पाटील मॅडम, रेवतकर सर, कृष्णा उईके सहित मोठ्या संख्येने विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.

Related posts