केवळ आश्वासने देत नाही तर पूर्तता करतो : खा. प्रफुल पटेल

176 Views

केवळ आश्वासने देत नाही तर पूर्तता करतो : खा. प्रफुल पटेल

प्रतिनिधि।

भंडारा/मोहाड़ी। मी दोन महिण्या अगोदरच धानाला बोनस मिळेल असा जाहीर केला होता. आमच्या शेतकरी सुखी तर गांव सुखी, जिल्हा सुखी. केंद्राचा मोदी साहेबांनी धानाला 1868/- चा भाव दिला आहे. या भावात शेतकऱ्यांना समाधान नाही, त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. 5 वर्षाच्या भाजपा च्या शासन काळात कधीही धानाला 2000/- च्या वर भाव मिळाला नाही. पांच वर्षासाठी ज्यांना खासदार म्हणून जनतेनी निवडणून दिले ते खासदार कुठे आहे. जिल्हयाचा खासदार कोण आहे याची अनेकांना माहितीच नाही. भाजपाच्या खोट्या प्रचाराने जनते मध्ये भ्रम निर्माण होत आहे. आम्ही दोन वर्षा पूर्वीच धानाला 2500/- चा भाव मिळले याची घोषणा केली होती. आम्ही धान उत्पादक शेतकऱ्यांना या वर्षीही महाराष्ट्र शासनास 700/- रुपये बोनस देण्यास भाग पाडले. जे आम्ही पूर्वीच सांगीतले ते आम्ही पूर्ण केले आहे.

पटेल म्हणाले, परिसरातील सिंचन प्रकल्पाचे काम कोणी पूर्ण केले व अपूर्ण कामे व परिसराच्या विकासाची काम कोण करु शकते याची जाणीव झाली पाहिजे. प्रलंबित सिंचन प्रकल्पा विषयी पाठ पुरावा सुरु असल्याचे खासदार श्री प्रफुल पटेल यांनी मत व्यक्त केले. मोहाडी तालुका राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाच्या वतीने करडी (मोहाडी) येथील कला व वाणिज्य महाविद्यालय च्या प्रांगणात आयोजित बैठकीत खा. पटेल मार्गदर्शन करतांना बोलत होते. तसेच यावेळी खा. पटेल यांनी समोरच्या जिला परिषद पंचायत समिती निवडणूकीत आपण सज्ज होऊन सगळयांनी काळजीपूर्वक काम करावे असे कार्यकर्तांना आव्हान केले.

या सभेला खा. प्रफुल पटेल, आमदार राजुभाऊ कोरेमोरे, नानाभाऊ पंचबुध्दे, मधुभाऊ कुकडे, धनंजय दलाल, वासुदेव बांते, देवचंद ठाकरे, यशवंत सोनकुसरे, झगडुजी बुधे, श्रीकांत पेठे, चंदुजी सेलोकर, रमेश पारधी, प्रमिलाताई साकुरे, अल्काताई बांते, कु. तारा हेडाऊ, अनिल काळे, महादेव फुसे , महादेव बुरडे सोबत इतर उपस्थित होते.

Related posts