यश प्राप्ती साठी संघटन महत्त्वाचे – माजी आमदार राजेंद्र जैन

105 Views

 

गोंदिया। गोंदिया तालुक्यातील ग्राम कन्हारटोला, बघोली, कलारीटोला व बाजारटोला येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची बूथ कमेटी सदस्य, पदाधिकारी व कार्यकर्ताची बैठक माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी त्यांनी परिसरातील नागरिक व कार्यकर्त्यांकडून विविध समस्यां जाणून घेतल्या त्या सोडविण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

यावेळी माजी आमदार राजेंद्र जैन यांनी पक्षाची ध्येय धोरणे व भूमिका याबाबत म्हणाले की, खासदार श्री प्रफुल पटेलजी यांच्या माध्यमातुन शेतकऱ्यांचा प्रगती साठी सिंचन व रोजगार उपलब्ध करणे व अन्य विकासाचे काम होत आहेत. याच जबाबदारीच्या दृष्टीकोनातून आपल्या गावांचा विकास करण्यासाठी आगामी विधानसभा निवडणुकीत बूथ कमेटीची सर्वात मोठी जिम्मेदारी आहे. गावातील कार्यकर्त्यांच्या माध्यमातुन पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. स्थानिक पातळीवर पक्ष संघटना मजबूत असेल तरं यश नक्की मिळेलच असे प्रतिपादन राजेंद्र जैन यांनी केले.

यावेळी राजेंद्र जैन, कुंदन कटारे, गणेश बरडे, केतन तूरकर, अखिलेश सेठ, रवी पटले, रजनी गौतम, सुनिल पटले, शैलेश वासनिक, रौनक ठाकूर, धर्मेंद्र परिमल, कालू चौहाण, संभू असाटी, भुवन हलमारे, नरेंद्र तेलासे, तिलकचंद खांडवाहे, रामचरण बिसेन, पुरुषोत्तम तेलासे, संतोष पाचे, रवी तेलासे, भागवत खांडवाहे, राजेश तेलासे, अनंतराम खांडवाहे, सोमाजी नेवारे, रामकिशोर तेलासे, राकेश तेलासे, ए आर तेलासे, सुखचंद नेवारे, मनोहर तेलासे, टेमनलाल तेलासे, हेमचंद तेलासे, कैलास काळबांधे, अजय जमरे, कमलेश पाचे, दिनेश पाचे, कांतीलाल सहारे, चिंतामण सहारे, प्रल्हाद लांजेवार, विश्राम पाचे, मिथलेस माने, पुरण घासले, दीपक कावरे, प्रमोद पाचे, रामप्रसाद पाचे, रविशंकर मेश्राम, विशाल कावरे, सुमेध माने, आकाश शिवणकर, एम एस बिसेन, मकसूद कुरेशी, भरतलाल राऊत, टेकलाल बाकट, महेश नेवारे, इस्माईल शेख, मेहमूद कुरेशी, कलाम शेख, राजेश नेवारे, जावेद शेख, युसुफ शेख, कमलदास, पारस डोंगरे, उमराव सोनवणे, संजू पारधी, नामदेव तुरकर, ओमकार तुरकर, राहुल चौधरी, निखिल पंधरे, रितिक पटले, डुलीचंद ऊईके, पवन पारधी, मोहित पटले, धर्मेंद्र तुरकर, समीर पारधी, रितेश पारधी सहित मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.

Related posts