374 Views
गोरेगाव. तालुक्यातील मोहाडी परिसरात बहुतांश शेतकऱ्यांना कडे कलपाथरी मध्यम प्रकल्पाचे पाणी व खाजगी विहीर,बोरवेल द्वारे सिंचनाच्या सोयी उपलब्ध असल्याने बरेचसे शेतकरी धान पिकाचे उत्पादन घेउन आपला उदरनिर्वाह करतात सध्या धान मळणीला सुरूवात झाली आहे परंतु शासकीय धान खरेदी केंद्र अद्याप सुरू झाले नाही त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी खाजगी व्यापारीना अल्प दरात धान विक्री करावी लागते त्यामुळे मोठा तोठा सहण करावा लागत आहे तरी शासनाने त्वरित शासकीय धान खरेदी केंद्र सुरू करण्यात यावी अशी मागणी गोरेगाव तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष तथा सरपंच नरेंद्र कुमार चौरागडे यांनी शासनाकडे केली आहे
मोहाडी परिसरातील शेतकऱ्यांची सर्व भिस्त शेतीवर अवलंबून आहे कलपाथरी मध्यम प्रकल्पातून सिंचनासाठी पाणी पुरवठा केले जाते त्यामुळे शेतकरी रब्बी हंगामात धानाची लागवड मोठ्या प्रमाणावर करित असतो पीक हातात आले पण हमीभाव केंद्राचा ठिकाणा नाही परिणामी कमी दराने खाजगी व्यापारीना शेतमालाची विक्री करावी लागत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा तोठा सहण करावा लागत आहे
यावर्षी निसर्गाच्या कोपामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे धान मळणी सुरू असताना अधुनमधून पाऊस विघ्न पाडत आहे पाऊसामुळे धानाच्या मळणीला उशीर केला तर धानावर विविध प्रकारच्या रोगाचा प्रादुर्भाव होऊन हाती आलेले पीक वाया जाण्याची भिती शेतकरी बांधवांना वाटत आहे धान खरेदी केंद्र सुरू न झाल्याने धानाची साठवण कोठे ठेवावी अशा विविध द्विधा अवस्थेत सापडला आहे तरी शासन, प्रशासनाने दखल घेउन त्वरित शासकीय आधार भुत धान खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी परिसरातील शेतकरी व तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष तथा सरपंच नरेंद्र कुमार चौरागडे यांनी शासनाकडे केली