गोंदिया येथे ऐतिहासिक नाट्यप्रयोगाला खा. राजेंद्र जैन यांच्या प्रमुख उपस्थिती
गोंदिया। महाडच्या चवदार तळे सत्याग्रहाच्या माध्यमातून भारतरत्न परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण समाजाला दिलेला समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि मानवी प्रतिष्ठेचा अमूल्य संदेश प्रभावीपणे नाट्यरूपात ‘पाण्याने पेटला वणवा’ या नाटकातून मांडण्यात आला आहे. या ऐतिहासिक नाटकाचे लेखन आमदार श्री राजकुमार बडोले यांनी केले असून, चवदार तळे सत्याग्रह हा केवळ पाण्याच्या हक्कासाठीचा लढा नव्हता, तर तो मानवी स्वाभिमान, सामाजिक न्याय आणि समानतेच्या अधिकारासाठी उभारलेला ऐतिहासिक संघर्ष होता.
![]()
महाड येथील ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दीनिमित्त सामाजिक समता, मानवी स्वाभिमान आणि मूलभूत हक्कांच्या संघर्षाचा जाज्वल्य इतिहास अधोरेखित करणारे ‘पाण्याने पेटला वणवा’ हे ऐतिहासिक नाटक भीमनगर, गोंदिया येथे सादर करण्यात आले. या नाट्य प्रयोगाला खासदार श्री राजेंद्र जैन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
![]()
या नाट्यप्रयोगातून त्या संघर्षाची तीव्रता, सामाजिक परिवर्तनाची प्रेरणा आणि भारतरत्न परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे महत्त्व,
इतिहासातील संघर्षमय प्रसंग, सामाजिक परिवर्तनाची प्रेरणा आणि स्वाभिमानाची जाणीव नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य अशा सांस्कृतिक उपक्रमांतून घडत असल्याची भावना खासदार श्री राजेंद्र जैन यांनी व्यक्त केली.
