पालकमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांना विश्रांती घेण्याचा डॅाक्टरांचा सल्ला, बॅकपेनमुळे बेडरेस्ट, मुंबईत उपचार सुरू

232 Views

 

गडचिरोली ।- राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री आणि गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांना पाठ व कंबर दुखापतीच्या आजारामुळे डॅाक्टरांनी विश्रांती घेण्याचा सल्ला दिला असून त्यांच्यावर मुंबईत उपचार सुरू आहे. त्यांनी विश्रांती न घेतल्यास त्यांच्यावर शस्रक्रिया करावी लागू शकते, असा ईशाराही डॅाक्टरांनी दिला आहे.

सविस्तर असे की, मंत्री आत्राम यांना पाठ व कंबर दुखीचा आजार काही महिन्यापासून सुरू होता, मात्र त्यांनी या दुखापतीकडे दुर्लक्ष करून लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार अशोक नेते यांच्या प्रचारात स्वतःला झोकून दिले होते. कंबरेला पट्टा बांधून ते संपूर्ण लोकसभा क्षेत्रात प्रचारासाठी फिरले, तब्येतीकडे त्यांचे झालेले दुर्लक्षच आता त्यांच्या दुखापतीसाठी कारणीभूत ठरले आहे. त्यामुळे डॅाक्टरांनी आता त्यांना विश्रांती घेण्यासाठी सांगीतले आहे.

आज ते मुंबईहून गडचिरोलीला परत येणार होते मात्र त्यांना प्रवास करण्यासाठी सुद्धा डॅाक्टरांनी मनाई केल्याचे सांगीतल्या जात आहे. त्यांनी विश्रांती घेतल्यास ते लवकर बरे होतील असेही डॅाक्टरांनी म्हटले आहे.

Related posts