मतदानाच्या दोन दिवसापूर्वी व मतमोजणीच्या दिवशी मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश..

371 Views       गोंदिया, दि.12 : भारत निर्वाचन आयोगाने 16 मार्च 2024 रोजी अधिसूचनेद्वारे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 चा कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानुसार भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात 19 एप्रिल रोजी निवडणूक होणार असून 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे. सदर निवडणूक खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाने मतदानाची वेळ संपण्यापूर्वी 48 तास अगोदरपासून तसेच मतमोजणीच्या दिवशी मद्यविक्री मनाई/ कोरडा दिवस जाहीर करण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत.         त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी महाराष्ट्र देशी दारु नियमावली 1973 चे नियम 26 (सी) (1) व मुंबई विदेशी मद्य (रोखीने विक्री, विक्रीच्या नोंदवह्या…

Read More