मतदानाच्या दोन दिवसापूर्वी व मतमोजणीच्या दिवशी मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश..

457 Views

      गोंदिया, दि.12 : भारत निर्वाचन आयोगाने 16 मार्च 2024 रोजी अधिसूचनेद्वारे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 चा कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानुसार भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात 19 एप्रिल रोजी निवडणूक होणार असून 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे. सदर निवडणूक खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाने मतदानाची वेळ संपण्यापूर्वी 48 तास अगोदरपासून तसेच मतमोजणीच्या दिवशी मद्यविक्री मनाई/ कोरडा दिवस जाहीर करण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत.

        त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी महाराष्ट्र देशी दारु नियमावली 1973 चे नियम 26 (सी) (1) व मुंबई विदेशी मद्य (रोखीने विक्री, विक्रीच्या नोंदवह्या इत्यादी) नियमावली 1969 चे नियम 9 ए (2) (सी) (1) मधील तरतुदींनुसार गोंदिया जिल्ह्यातील ठोक व किरकोळ देशी/ विदेशी मद्यविक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश पारीत केले आहे. त्यानुसार 17 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी 6 वाजेपासून पुढे (मतदान संपण्याच्या 48 तास अगोदर), 18 एप्रिल 2024 रोजी मतदानाच्या पूर्वीचा संपूर्ण दिवस, 19 एप्रिल 2024 रोजी मतदानाचा संपूर्ण दिवस व 4 जून 2024 रोजी मतमोजणीचा संपूर्ण दिवस मद्यविक्री बंद ठेवावी. सदर आदेशाचे उल्लंघन करुन मद्यविक्री करीत असल्याचे आढळून आल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.

Related posts