किती दिवस धान्य पुरवणार? लॉकडाऊन काढला नाही तर लोक गप्प बसणार नाहीत; उदयनराजे यांचा केंद्राला सल्ला

37,511 Viewsसातारा : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशात पुन्हा एकदा लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. यावर माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी टीका केलीय. लॉकडाऊन कधी उठणार? लॉकडाऊन काढला नाही तर लोक गप्प बसणार नाही, किती दिवस अन्यधान्य पुरवणार? असा सल्लाही उदयनराजे भोसले यांनी केंद्राला दिलाय. त्यामुळे केंद्र आणि राज्यांनी एकत्र येऊन चर्चा करुन लॉकडाऊन उठवण्याविषयी निर्णय घ्यावा, असंही ते म्हणाले. लॉकडाऊनमुळे लाखो लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे लॉकडाऊन किती दिवस वाढवणार? असा प्रश्न माजी खासदार उदयनराजे यांनी राज्यासह केंद्राला विचारला आहे. माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी आज एबीपी माझाशी संवाद साधला.…

Read More