911 Views प्रतिनिधि। गोंदिया,दि.24 : पालकमंत्री नवाब मलिक हे 26 व 27 सप्टेंबर रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. 26 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता नागपूर येथून मोटारीने भंडारा, सडक अर्जुनी मार्गे गोंदियाकडे प्रयाण. रात्री 9 वाजता गोंदिया येथे आगमन व राखीव-मुक्काम. 27 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी यांच्या समवेत बैठक. सकाळी 9.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात पोलीस अधिक्षक यांच्या समवेत बैठक. सकाळी 9.45 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा नियोजन अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा प्रशासन अधिकारी यांच्या समवेत बैठक. सकाळी…
Read MoreCategory: मराठी बातम्या
गोंदिया: पांगोली च्या तीरावर टेमनीतील युवकांची स्वच्छता मोहीम, सर्वत्र कौतुक
415 Views गोंदिया (ता.22)गणेश विसर्जना निमित्त पांगोली च्या तिरावर मोठ्या प्रमाणात जमा झालेले निर्माल्य स्वच्छता मोहीम राबवून टेमनी येथिल युवकांनी स्वच्छ केले.त्यांनी केलेल्या या समाजपयोगी कार्याचा सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. गोंदिया शहरातील गणेश भक्त गणपती विसर्जनासाठी लागूनच असलेल्या टेमनी च्या पांगोली तीरावर येत असतात. यावर्षी शुद्धा या काठावर मोठ्या प्रमाणात गणेश मूर्ती विसर्जना साठी आल्या. मूर्ती विसर्जन केल्यानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निर्माल्य,केरकचरा तसेच इतर साहित्य जमा होत असते. हे साहित्य तसेच ठेवून नागरिक आपल्या घराला निघून जातात. त्यामुळे नदी परिसरात मोठ्या प्रमाणात निर्माल्य व केर कचरा जमा झाला…
Read Moreगोरेगाँव: ई-पीक पाहणी बाबत कृषिदूताकडून शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक रीत्या मार्गदर्शन..
591 Views गोरेगाँव। (20 सेप्ट.), संपूर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्यांना ई पीक पाहणी ॲप द्वारे पिक पेरा नोंदणी बंधनकारक केली असून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना या संदर्भात विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. ही बाब लक्षात घेता, गोरेगाव तालुक्यातील ग्रामपंचायत मोहगाव बु.ज. येथे मनोहरभाई पटेल कॉलेज ऑफ ॲग्रीकल्चर हिराटोला संलग्नित डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथील कृषी विद्यार्थ्यांनी, विद्यार्थी वैभव आर. पटले, सागर बोपचे, आशिष कटरे, आयुष ठाकूर यांनी शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी बाबत प्रात्यक्षिक रित्या मार्गदर्शन केले. कार्यक्रम स्थळी गावातील उपसरपंच- कमलेश्वर रहांगडाले, ग्रामपंचायतचे लिपिक- बुधराम बोपचे तसेच गावातील प्रगतशील शेतकरी शोभेलाल…
Read Moreगोंदिया: ओबिसीनो आपल्या संवैधानिक अधिकार प्राप्तीसाठी लढ्यात सामील व्हा.., राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे आवाहन
361 Views प्रतिनिधी गोंदिया: घटनेत तरतूद असूनही बहुसंख्य ओबीसी समाज हा आपल्या हक्क व अधिकारापासून वंचीत आहे. त्यामुळे समाजाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. संवैधानिक अधिकार प्राप्तीसाठी ओबीसीनी मतभेद बाजूला सारून एक जुटिने संघर्ष लढ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन राष्ट्रीय ओबीसी महासंघाने केले आहे. 1994 पासून मिळत असलेले ओबीसी संवर्गाचे 27 टक्के राजकीय आरक्षण सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर धोक्यात आले असून न्यायालयाने यासाठी तीन टेस्ट करावयास सांगितले. त्यानुषंगाने राज्य सरकारने समर्पित आयोगाची स्थापना केलेली आहे. अनुभवजन्य माहिती देखील काही दिवसात गोळा होईल. त्यानंतर कोणत्या ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, महानगरपालिका,…
Read Moreगोंदिया तालुक्यातील इर्री येथील शेतकरी आंदोलकांची प्रकृती ढासळली, प्रशासनाचे दुर्लक्ष
304 Views गोंदिया(ता.17) दीड महिन्यापासून तालुक्यातील इर्री येथील शेतकरी ओमकार नंदलाल दमाहे हे आपल्या विविध मागण्यांना घेऊन आंदोलनावर बसले आहेत. आंदोलन सुरू असतानाच शुक्रवारी (ता 17) सकाळी त्यांची प्रकृती ढासळली. प्रकृती अस्वस्थ झाल्याने त्यांना तात्काळ मोरवाही येथील आरोग्य केंद्रात हलविण्यात आले. तब्बल दीड महिन्यापासून सदर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असून सदर आंदोलनाकडे जिल्हा प्रशासनाने डोळे फिरविल्याने परिसरातील शेतकऱ्यांत रोष दिसून येत आहे. येथील शेतकरी ओमकार नंदलाल दमाहे यांची शेतातील झोपडी कोणतेही अतिक्रमण हटाव आदेश नसतानाही ग्रामपंचायत प्रशासनाने जमीनदोस्त केली. आपल्यावर झालेल्या या अन्यायाविरुद्ध दाद मिळावी व दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी म्हणून…
Read More