गोरेगाँव: ई-पीक पाहणी बाबत कृषिदूताकडून शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक रीत्या मार्गदर्शन..

388 Views

 

गोरेगाँव। (20 सेप्ट.), संपूर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्यांना ई पीक पाहणी ॲप द्वारे पिक पेरा नोंदणी बंधनकारक केली असून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना या संदर्भात विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. ही बाब लक्षात घेता, गोरेगाव तालुक्यातील ग्रामपंचायत मोहगाव बु.ज. येथे मनोहरभाई पटेल कॉलेज ऑफ ॲग्रीकल्चर हिराटोला संलग्नित डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथील कृषी विद्यार्थ्यांनी, विद्यार्थी वैभव आर. पटले, सागर बोपचे, आशिष कटरे, आयुष ठाकूर यांनी शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी बाबत प्रात्यक्षिक रित्या मार्गदर्शन केले.

कार्यक्रम स्थळी गावातील उपसरपंच- कमलेश्वर रहांगडाले, ग्रामपंचायतचे लिपिक- बुधराम बोपचे तसेच गावातील प्रगतशील शेतकरी शोभेलाल बावनकर, निलचंद पटले, देवाजी पटले, दिलीप देसाई, चुनीलाल पटले, पप्पू कटरे व इतर शेतकरी उपस्थित होते.

Related posts